PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, RBI कडून खातेदारांना मोठा दिलासा 

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Sep 26, 2019 | 17:12 IST

रिझर्व्ह बॅंकेनं पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता ही मर्यादा 1 हजारांहून 10 हजार करण्यात आली आहे. बँकेचे एमडी जॉय थॉमस यांना निलंबित करण्यात आलं आहे.

PMC Bank
PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, RBI कडून खातेदारांना मोठा दिलासा   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी  (पीएमसी)  बँकेतल्या खातेदारांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
  • आता खातेदारांना बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली.
  • यापूर्वी ही मर्यादा 1 हजार होती, आता ही मर्यादा 1 हजारांहून 10 हजार करण्यात आली आहे.
  • आरबीआयनं हा निर्णय देऊन पीएमसीच्या खातेदारांना  मोठा दिलासा आहे.

मुंबईः पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी  (पीएमसी)  बँकेतल्या खातेदारांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता खातेदारांना बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली. यापूर्वी ही मर्यादा 1 हजार होती, आता ही मर्यादा 1 हजारांहून 10 हजार करण्यात आली आहे. आरबीआयनं हा निर्णय देऊन पीएमसीच्या खातेदारांना  मोठा दिलासा आहे. दरम्यान पीएमसी बँकेचे एमडी जॉय थॉमस यांना निलंबित करण्यात आलंय. आरबीआयनं ही कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी आयबीआयनं या बँकेतील व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्यानं काही निर्बंध घातले आहेत.

रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे की, सेव्हिंग अकाऊंट किंवा करंट अकाऊंटमधून 10 हजार रूपये खातेदारांना काढता येणार आहेत. त्यातही जर कोणीही याआधी 1 हजार रूपये काढले असतील तर ते ग्राहक सुद्धा 10 हजार काढू शकणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर बँकेचे 60 टक्के खातेधारक आपल्या खात्यातील पूर्ण पैसे काढू शकणार आहेत. 

 

 

आज काही बँकेच्या खातेदारांनी पोलिसांकडे सामूहिक तक्रार दाखल केली आहे. या लोकांनी बँकेचे चेअरमन आणि त्यांच्या डायरेक्टर विरोधात जनतेचा पैसा लुटल्याचं तक्ररीत नमूद केलं आहे. खातेदारांनी यावेळी म्हटलं की, तक्रारीत ज्या ज्या लोकांच्या नावाचा उल्लेख आहे अशा लोकांचे पासपोर्ट जप्त करावे, जेणेकरून ते लोकं देश सोडून जाणार नाही. 

बँकेचे निलंबित एमडी जॉय थॉमस यांनी एका एजन्सीसोबत बोलताना दावा केला आहे की, बँकेकडे पर्यायी रोख रक्कम आहे आणि लोकांचे पैसे सुरक्षित आहे. बँकेचे सर्व लोन सुरक्षित आहेत. केवळ एक मोठं खातं एचडीआयएल संकटाचं कारण आहे. आरबीआयनं बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. तसंच बँकेचं कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. 

दरम्यान थॉमस यांनी HDIL ला किती कर्ज दिलं याबाबतची माहिती दिली नाही. थॉमस पुढे म्हणाले की, आमच्याकडे पर्यायी रोख आहे. त्यासोबतच आम्ही जे कर्ज दिलं आहे, त्याऐवजी पर्यायी सिक्युरिटीज आहेत. आम्ही कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत नाही आणि आमचे कर्ज कव्हरेजचे प्रमाण नेहमीच 100-110 टक्के राहिले आहे.  बँकेकडे सांविधिक तरलता अनुपात (एसएलआर) आणि कॅश रिझर्व्ह रेशिओ (सीआरआर) च्या रूपानं 4000 कोटी रूपयांची रोख रक्कम आहे. बँकेचं उत्तरदायित्व जवळपास 11,600 कोटी रूपये असल्याचं थॉमस यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी