PMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू 

काम-धंदा
Pooja Vichare
Updated Oct 15, 2019 | 22:24 IST

पीएमसी बँक खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. फात्तोमल पंजाबी असं खातेधारकाचं नाव आहे. पंजाबी यांना आज दुपारी 12.30 च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

PMC Bank Holder
PMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पीएमसी बँक खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
  • फात्तोमल पंजाबी असं खातेधारकाचं नाव आहे.
  • पंजाबी हे मुलुंडमधले रहिवाशी आहेत

पंजाब अॅड महाराष्ट्र बँकेचे (PMC)खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका खातेधारकाचा बळी गेला आहे. पीएमसी बँक खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. फात्तोमल पंजाबी असं खातेधारकाचं नाव आहे. पंजाबी यांना आज म्हणजेच मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. पंजाबी हे मुलुंडमधले रहिवाशी आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, फात्तोमल पंजाबी ज्या कॉलनीमध्ये राहतात त्या कॉलनीतील 95 टक्के लोकांची बँक खाती ही पीएमसी बँकेत आहेत.

सोमवारी 51 वर्षीय संजय गुलाटी यांचं देखील हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.  त्यांचे या बँकेत जास्त पैसे जमा होते. जवळपास 90 लाख रूपये त्यांच्या बँकेत फसले होते. ज्यामुळे ते खूप त्रस्त होते. संजय हे मृत्यू होण्याआधी बँक विरूद्ध केलेल्या आंदोलनातही सहभागी झाले होते. आंदोलन झाल्यानंतर त्यांना  हृदयविकाराच्या झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संजय गुलाटी हे ओशिवरामध्ये राहत होते. ओशिवरामधल्या पीएमसी बँकेच्या ब्रांन्चमध्ये त्यांचं खातं होतं. 

असं सांगितलं जातं आहे की, संजय गुलाटी जेव्हा आंदोलन करत होते त्यावेळी गुंतवणूक दारांकडे रडत रडत पैसे परत करण्यासाठी विनंती करताना दिसले. त्यानंतर सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना टेन्शन आलं आणि त्यातच त्यांची तब्येत खराब झाला. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

 

पंजाब अॅड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँक (PMC) संकटाक अडकली आहे. याआधी 14 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेनं बँकेत्या ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा 25 हजारांपासून वाढून 40 हजार रूपये प्रति खातेधारक अशी केली होती. ही तिसरी संधी आहे जेव्हा केंद्रीय बँकेनं ग्राहकांना दिलासा देत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी