PNB Bank | पंजाब नॅशनल बॅंकेने पैसे जमा करणाऱ्यांना दिला धक्का तर कर्ज घेणाऱ्यांची मजा

PNB Bank Interest rate | पीएनबी बॅंकेत जर तुम्ही बचत खाते असेल आणि बचत खात्यातील रक्कम १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आता वार्षिक २.८ टक्के व्याजदर म्हणजे वर्षाला १०० रुपयांवर फक्त २.८० रुपये व्याज मिळणार आहे.

PNB Bank Interest rate
पंजाब नॅशनल बॅंकेचे व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • पंजाब नॅशनल बॅंकेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी
  • पीएनबीकडून बचत खात्यावरील व्याजदरात कपात
  • पीएनबीकडून विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात कपात

PNB Bank Interest rate | नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक असणाऱ्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या ( Punjab National Bank) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत बचत खाते (Savings Account) उघडणाऱ्यांसाठी या बातमीचे महत्त्व मोठे आहे. पीएनबी मध्ये बचत खाते असणाऱ्यांना बॅंकेने मोठा झटका दिला आहे. त्याउलट जर तुम्हाला पंजाब नॅशनल बॅंकेतून कर्ज घ्यायचे (Loan)असेल तर तुम्ही फायद्यात रहाल. छोटी छोटी बचत करून बचत खात्यात पैसे जमा करणाऱ्यांना पंजाब नॅशनल बॅंकेने चांगलाच फटका दिला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेने बचत खात्यावरील व्याजदर (Interest rate on savings account) कमी केले आहेत. (PNB Bank: Punjab National Bank reduces the interest rate on savings account & loan)

बचत खात्यातील व्याजदरात कपात

बचत खात्यात छोट्या रकमेनिशी पैसे जमा करत बचत वाढवणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी बचत खात्यावरील व्याजदर कमी होणे हे एक फटकाच आहे. पीएनबी बॅंकेत जर तुम्ही बचत खाते असेल आणि बचत खात्यातील रक्कम १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आता वार्षिक २.८ टक्के व्याजदर म्हणजे वर्षाला १०० रुपयांवर फक्त २.८० रुपये व्याज मिळणार आहे. पीएनबीने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करत ते २.९० टक्क्यांवरून २.८० टक्क्यांवर आणले आहे. १ डिसेंबर २०२१ पासून हा बदल लागू होणार आहे.

सर्वच खातेधारकांना फटका

अर्थात जर तुमच्या बचत खात्यात १० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर खूप जास्त लाभदेखील होणार नाही. कारण यासाठीच्या व्याजदरातदेखील कपात करण्यात आली आहे. १० लाख रुपयांवर जर बचत खात्यातील रक्कम असेल तर २.८५ टक्के व्याज मिळणार आहे. म्हणजे १०० रुपयांवर वर्षाकाठी २.८५ रुपये व्याज मिळणार आहे. जर तुम्ही इतर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांशी पंजाब नॅशनल बॅंकेच्या व्याजदराची तुलना केली तर देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये यापेक्षाही कमी व्याज मिळते आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया वार्षिक २.७० टक्के व्याज देते आहे. हे व्याज १ लाख रुपयांपर्यतच्या बचत खात्यावर लागू होते. बॅंकेच्या या निर्णयाचा परिणाम सर्व खातेधारकांवर होते आहे. एनआरआय ग्राहकांनादेखील इतकेच व्याज मिळते आहे.

कर्ज घेणाऱ्यांची मजा

पंजाब नॅशनल बॅंकेतून गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज किंवा कार लोन घेणाऱ्या ग्राहकांना बॅंकेने मोठा दिलासा दिला आहे. पीएनबीने आपल्या कर्जावरील ५ बेसिस पॉइंट कमी करत व्याजदर ६.५० टक्के केला आहे. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ८ नोव्हेंबर पासून ६.५५ टक्क्यांवरून घटवून ६.५० टक्के करण्यात आला आहे. यामुळे आता पीएनबीचे कार लोन, होम लोन, शैक्षणिक कर्ज किंवा पर्सनल लोन सर्वच स्वस्त होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी