PNB Update : बचत, गुंतवणूक आणि कर्जाची सुविधादेखील...पाहा पंजाब नॅशनल बॅंकेची ही जबरदस्त योजना

Investment : देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त योजना आणली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या या योजनेबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. आर्थिक स्थैर्यासाठी बचत (Savings) आणि गुंतवणूक (Investment) या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुम्हाला आर्थिक सुबत्ता हवी असल्यास बचत आणि कमाईकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही बचत केली आणि त्यातूनच गुंतवणूक केली तरच आर्थिक पातळीवर तुमचे भविष्य सुरक्षित होते.

PNB Flexi Recurring Deposit Scheme
पंजाब नॅशनल बँकेने नवी फ्लेक्सी रिकरिंग डिपॉझिट योजना 
थोडं पण कामाचं
  • पंजाब नॅशनल बँकेने नवी फ्लेक्सी रिकरिंग डिपॉझिट (PNB Flexi Recurring Deposit Scheme)योजना
  • गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणजे बँकांच्या विविध योजनांमध्ये बचत किंवा गुंतवणूक करणे
  • आर्थिक सुबत्ता हवी असल्यास बचत आणि कमाईकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

PNB flexi recurring deposit scheme:नवी दिल्ली : देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त योजना आणली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या या योजनेबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. आर्थिक स्थैर्यासाठी बचत (Savings) आणि गुंतवणूक (Investment) या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुम्हाला आर्थिक सुबत्ता हवी असल्यास बचत आणि कमाईकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पंजाब नॅशनल बँकेने नवी फ्लेक्सी रिकरिंग डिपॉझिट (PNB Flexi Recurring Deposit Scheme)योजना आणली आहे. पीएनबीच्या या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊयात. (PNB launches new PNB Flexi Recurring Deposit Scheme, check details)

अधिक वाचा : Dahihandi Govinda Injured : मुंबईत दहीहंडी फोडताना २२२ गोविंदा जखमी, ठाण्यातही जखमींची संख्या लक्षणीय

जर तुम्ही बचत केली आणि त्यातूनच गुंतवणूक केली तरच आर्थिक पातळीवर तुमचे भविष्य सुरक्षित होते. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही बचत करू शकता तसेच गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. यापैकी एक सुरक्षित मार्ग म्हणजे बँकांच्या विविध योजनांमध्ये बचत किंवा गुंतवणूक करणे. मुदत ठेवींप्रमाणेच बँका आपल्या आवर्ती ठेवींवरही म्हणजे आरडी योजनांवरदेखील व्याज देतात.

अधिक वाचा : Health: गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

काय आहे पीएनबीची योजना 

बँकेने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या योजनेमध्ये किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. याशिवाय तुमची जास्तीत जास्त गुंतवणूक दरमहा ५० हजार रुपये असू शकते. तुम्ही या योजनेसाठी किमान 6 महिने आणि कमाल 120 महिन्यांसाठी खाते उघडू शकता. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता चुकल्यास तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. त्याच वेळी, 5.75% व्याजदर दिला जातो आहे.

अधिक वाचा : Hartalika Teej 2022 :  या तारखेला आहे हरितालिकेचे व्रत, जाणून घ्या नियम आणि विधी

विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत बँक ओव्हरड्राफ्ट आणि कर्जाची सुविधाही देते. याशिवाय नामांकनाचीही सोय आहे. तुम्हालाही योजनेअंतर्गत पैसे जमा करून नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या दोन महिन्यांत रेपो दरात (Repo rate) तीनदा वाढ केली आहे. यानंतर बँकांमध्ये बचत योजनांवरील किंवा मुदतठेवींवरील व्याजदर (Interest rate) वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील व्याजदर वाढत आहेत. खासगी आणि सरकारी बँकां ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ करताना दिसत आहेत.

एकाच दिवसात चार मोठ्या बँकांनी व्याजदर वाढवण्याची घोषणा केल्याने ग्राहकांची अधिकच चांदी झाली. मात्र, व्याजदरातील ही वाढ वेगवेगळ्या तारखांपासून लागू झाली आहे. ज्या बँकांनी व्याजदरात बदल केला आहे त्यात आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे.

पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेचे नवे दर 17 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, एक वर्षापासून तीन वर्षांपर्यंत आणि 5 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या मुदतीसह एफडीचा दर वाढवण्यात आला आहे. 10 वर्षांपर्यंतच्या एफडीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी