PNB Update: पीएनबीच्या ग्राहकांसाठी खूशखबर! एकाच आठवड्यात दोनदा एफडीवरील व्याजदरात वाढ

Bank interest rates : एकाच आठवड्यात बॅंकेने दोनदा व्याजदरात (Interest rate hike) वाढ केली आहे. त्यामुळे तुमचे खातेही पंजाब नॅशनल बँकेत असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एका आठवड्यात दुसऱ्यांदा मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात ही वाढ केली आहे.

Interest rates
व्याजदरात वाढ 
थोडं पण कामाचं
  • पीएनबीकडून व्याजदरात वाढ
  • आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने बॅंकांकडून व्याजदरात वाढ
  • मुदतठेवींवर मिळणार जास्त व्याज

PNB FD Rate Hike :नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेच्या (PNB) ग्राहकांसाठी बॅंकेने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील आघाडीच्या बॅंकेच्या आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. एकाच आठवड्यात बॅंकेने दोनदा व्याजदरात (Interest rate hike) वाढ केली आहे. त्यामुळे तुमचे खातेही पंजाब नॅशनल बँकेत असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एका आठवड्यात दुसऱ्यांदा मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील  व्याजदरात ही वाढ केली आहे. व्याजदरातील नवी वाढ 26 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. याआधी पंजाब नॅशनल बॅंकेने 19 ऑक्टोबरला  एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती. (PNB rises the FD interest rates)

अधिक वाचा : युनिलिव्हरला ग्रहण !, Dove आणि Tresemme Shampoo मुळे कॅन्सरचा धोका

रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात वाढ करण्यात आल्यामुळे विविध बॅंकांकडून मागील काही महिन्यात व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

आरबीआयकडून रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने मे महिन्यापासून चार वेळा रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर सर्व खासगी आणि सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ करून त्याचा फायदा ग्राहकांना दिला आहे. बॅंकेने याबरोबरच बचत खात्याच्या व्याजदरातही वाढ केली आहे. मात्र व्याजदरात वाढ झाल्यामुळे मुदतेठवींवर जसे जास्त व्याज मिळणार आहे, त्याचप्रमाणे याचा परिणाम गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात वाढ होण्यातही झाला आहे.

अधिक वाचा : Diwali 2022: या बँकांमध्ये मिळतायेत स्वस्त व्याजदरात कर्जे...पाहा जबरदस्त ऑफर्स

विविध FD वरील  व्याजदर

पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर व्याजदर 75 बीपीएसने वाढला आहे. तो वाढून 4.50 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे 180 दिवसांच्या एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5 टक्क्यांऐवजी 5.5 टक्के व्याज मिळेल. एक वर्षापासून 599 दिवसांपर्यंतच्या FD साठी, व्याजदर 60 बीपीएसने वाढला आहे. आता तो 6.30 टक्के झाला आहे, पूर्वी तो 5.70 टक्के होता.

अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.80% पर्यंत व्याज

त्याचप्रमाणे दोन वर्षे ते तीन वर्षांच्या एफडीवरील व्याज 5.80 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाले आहे. ताज्या दरवाढीनंतर, तीन वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठीचा व्याजदर 6.10 टक्क्यांवर गेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य दरापेक्षा 50 bps अतिरिक्त व्याज मिळेल. त्यांना 4 टक्के ते 7.50 टक्के व्याज मिळेल. सुपर ज्येष्ठ नागरिकांना 4.30 ते 7.80 टक्के व्याज मिळेल.

अधिक वाचा - Relationship Tips : कोणत्याही पत्नीला पतीच्या या गोष्टी आवडत नाहीत

दिवाळी ऑफर

याआधी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी पीएनबी 600 दिवसांची एफडी योजना सुरू केली होती. या ऑफर अंतर्गत, बँक ग्राहकांना FD वर जबरदस्त परतावा ऑफर करण्यात आला. PNB 600 Days FD योजनेअंतर्गत, ग्राहकांना 6.50 ते 7.30 टक्के व्याज दिले जात होते. बँकेच्या वतीने ट्विट करून या ऑफरची माहिती देण्यात आली. या ऑफरशी संबंधित माहिती पीएनबीच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी