PNB Pre-approved personal loans : नवी दिल्ली : विविध कारणांमुळे आपल्याला कर्ज घ्यावे लागते. त्यातही जर काही कौटुंबिक खर्च किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चासाठी कर्ज घेण्याची वेळ आली तर पर्सनल लोन (Personal Loan) हा सर्वसाधारणपणे वापरला जाणारा पर्याय आहे. मात्र अनेकवेळा पर्सनल लोन घेण्याची प्रक्रिया सोपी नसते. मात्र आता देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (PNB)ही सुविधा अक्षरश: काही क्लिकवर आणून ठेवली आहे. पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या PNB One या मोबाइल बँकिंग अॅप वर ‘4 क्लिक्स आणि सिंगल OTP मध्ये पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्जे (Pre-approved personal loans) लाँच केली आहेत. या सुविधेचा शुभारंभ PNB चे MD आणि CEO अतुल कुमार गोयल यांनी बँकेच्या नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयात, कार्यकारी संचालक - संजय कुमार, विजय दुबे आणि कल्याण कुमार, CGM, वरिष्ठ अधिकारी आणि इतर बँक कर्मचारी यांच्या उपस्थितीत केला. (PNB to provide pre-approved personal loans in 4 clicks, check the facility)
PNB चे MD आणि CEO अतुल कुमार गोयल म्हणाले, “झटपट क्रेडिट उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त, 4 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कागदपत्रांची कोणतीही अडचण नाही. पीएनबीला आशा आहे की ही सुविधा बँकिंग उद्योगासाठी जबाबदार डिजिटल कर्जाचे उदाहरण म्हणून काम करेल आणि किरकोळ क्षेत्रातील सर्वोत्तम सुविधांपैकी एक सिद्ध होईल.”
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के
46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.75 टक्के
91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.50 टक्के
180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के
1 वर्ष: सामान्य लोकांसाठी - 5.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.80 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांवरील: सामान्य लोकांसाठी - 5.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.80 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे वरील: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षांवरील: सामान्य लोकांसाठी - 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.10 टक्के
1111 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के.