Post Office च्या या योजनेत गुंतवा १० हजार आणि मिळवा १६ लाख

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग योजनेत ५ वर्षांपासून ते १० वर्षांपर्यतचा कालावधी असतो. यामध्ये दर महिन्याला १०,००० रुपये जमा करावे लागतात. १० वर्षांपर्यत दरमहा १०,००० रुपये जमा केल्यावर १२ लाख रुपये जमा होतील आणि यावर ५.८ टक्के व्याजदराने तुम्हाला १६,२६,४७६ रुपये मिळतील. ही गुंतवणूक ५ वर्षांसाठीदेखील असते.

Post Office Scheme
पोस्ट ऑफिसची योजना 
थोडं पण कामाचं
  • योजनेत ५ वर्षांपासून ते १० वर्षांपर्यतचा कालावधी
  • या योजनेवर ५.८ टक्के व्याजदर मिळतो
  • पोस्टाची रिकरिंग योजना

Post Office Scheme: नवी दिल्ली : गुंतवणुकीचे (Investment) विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत आणि यामध्ये विविध परतावा दिला जातो आहे. यातील काही योजनांमध्ये जोखीम अधिक असते तर काही योजनांमध्ये जोखीम कमी असते. अनेक गुंतवणुकदार कमी जोखमीच्या सुरक्षित पर्यायात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कमी जोखमीच्या आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांचा समावेश आहे. भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे चालवण्यात येणारी रिकरिंग डिपॉझिट योजना हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. (Post office recurring scheme, good option for investment)

१० वर्षात मिळतील इतके पैसे

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग योजनेत ५ वर्षांपासून ते १० वर्षांपर्यतचा कालावधी असतो. यामध्ये दर महिन्याला १०,००० रुपये जमा करावे लागतात. १० वर्षांपर्यत दरमहा १०,००० रुपये जमा केल्यावर १२ लाख रुपये जमा होतील आणि यावर ५.८ टक्के व्याजदराने तुम्हाला १६,२६,४७६ रुपये मिळतील. ही गुंतवणूक ५ वर्षांसाठीदेखील असते.

जर तुम्ही गुंतवणूक कालावधीदरम्यान रिकरिंग योजनेत पैसे जमा नाही करू शकलात, किंवा काही कारणास्तव खंड पडला तर तुम्ही ही योजना पुन्हा सुरू करू शकता. नियमानुसार ४ सलग हफ्ते न भरल्यास खाते बंद होते मात्र पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला १ रुपयावर १ रुपया लेट फी भरावी लागते.

पोस्ट ऑफिस आरडी योजना

पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यात छोटी रक्कम जमा करून मॅच्युरिटीला तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता. या खात्यात गुंतवणूक छोट्या प्रमाणात करावी लागत असली तरी ती नियमितपणे करावी लागते. आरडी खात्याचे वैशिष्ट्यं असे की तुम्ही यात फक्त १०० रुपयांपासूनदेखील सुरूवात करू शकता. पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यात कमाल गुंतवणुकीला मर्यादा नाही. तुम्ही हवी तितकी गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही जितकी जास्त रक्कम जमा कराल तितका जास्त परतावा मिळेल.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा कालावधी

पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्याचा कालावधी ५ वर्षांचा असतो. ही आरडी योजना जर बॅंकेत सुरू केली तर त्यात ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे आणि ३ वर्षे असा कालावधी असतो. आरडी खात्यावर मिळणारे व्याज वार्षिक स्वरुपाचे असते मात्र ते तिमाही स्वरुपात मिळते. जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम प्रत्येत तिमाहीला खातेधारकाच्या खात्यात जमा केली जाते.

किती आहे व्याजदर

सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीमवर ५.८ टक्के व्याज देण्यात येते आहे. व्याजाचे नवे दर १ एप्रिल २०२०पासून लागू आहेत. सरकार सर्वच अल्पबचत योजनांचे व्याजदर निश्चित करत असते. दर तिमाहीचे हे व्याजदर निश्चित केले जातात.

आरडी खात्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे हे नियमितपणे सुरू राहिले पाहिजे. जेव्हा रक्कम करायला हवी तेव्हा ती झालीच पाहिजे. जर तुमच्या खात्यात रक्कम जमा होणे बंद झाले तर त्या खात्याला पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. दर महिन्याच्या रकमेच्या १ टक्क्यांप्रमाणे हा दंड भरावा लागतो. लागोपाठ चार वेळा जर खात्यात रक्कम जमा झाली नाही तर खाते बंद होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी