पीपीएफ खातेधारकांनो! प्रत्येक महिन्याची पाच तारीख आहे महत्त्वाची; या तारखेला विसरलात तर होईल नुकसान

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 12, 2021 | 09:36 IST

भविष्यातील बचत आणि रिटर्न, करात सूट मिळावी यासाठी पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी (Public provident fund) हे लॉग टर्मच्या गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

PPF account holders The fifth date of each month is important
पीपीएफ: प्रत्येक महिन्याची पाच तारीख आहे महत्त्वाची  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पीपीएफवर व्याजदर ७.१ टक्के
  • टॅक्समधून सूट मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे पीपीएफ खाते
  • प्रत्येक महिन्याला भरणा केल्यास होईल जबरदस्त फायदा

नवी दिल्ली : भविष्यातील बचत आणि रिटर्न तसेच  करात सूट मिळावी यासाठी पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी (Public provident fund) हा लॉग टर्मच्या गुंतवणुकीसाठी  सर्वोत्तम पर्याय आहे. यात जमा झालेल्या पैशांवर कोणताच कर लागत नाही. याचबरोबर व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रक्कमेवरही टॅक्स लागत नाही. यामुळे पीपीएफ(PPF)विषयी योग्य माहिती आपल्यासाठी हितकारक असते. आज अशाच एका महत्त्वाच्या गोष्टीविषयी आपण जाणून घेणार आहोत. जर गोष्टी आपल्याकडून चुकीने राहिली तर आपले नुकसान होऊ शकते. 

पीपीएफमध्ये वर्षाला ५०० रुपये ते १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाते. सध्या पीपीएफवरील व्याजदर हे ७.१ टक्के आहे. पीपीएफची सर्वात मोठी विशेषता ही आहे की, प्रत्येक महिन्यात आपण हप्त्यानुसार पैसा जमा करू शकतो. यामध्ये वार्षिक व्याज दराला मासिक व्याज दरामध्ये विभागून व्याज मोजले जाते. तथापि, ही रक्कम वर्षाच्या शेवटीच जमा केली जाईल. परंतु, तुम्हाला माहिती आहे काय की पीपीएफच्या हप्त्याच्या बाबतीत उशीर केल्याने व्याजांच्या बाबतीत तुमचे नुकसान होऊ शकते.

प्रत्येक महिन्याची ही तारीख आहे महत्त्वाची 

जर तुम्ही प्रत्येक महिन्याला हप्त्यानुसार पीपीएफ खात्यात पैसे जमा करत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याची ५ तारीख लक्षात ठेवावी लागेल. कारण की , प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला बेस मानून पीपीएफवर व्याजची गणना केली जाते. पीपीएफ खात्यावरील व्याजाची मोजणी महिन्याच्या पाचव्या दिवसापर्यंत असलेल्या मिनिमम बॅलन्सवर केले जाते. यासाठी जर तुम्हाला वाटतं की, पीपीएफमधील जमा झालेल्या पैशांचा पुर्ण फायदा मिळावा त्याकरिता प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला पैसे जमा करणे आवश्यक आहे. असे केल्याने डिपॉजिटवर नवीन हप्ता जोडला जाईल.

याप्रकारे होते कॅलक्युलेशन - 

समजा तुम्ही एप्रिल महिन्यात पीपीएफचे खाते ५०० रुपयांपासून सुरू केले. दर महिन्याला या खात्यात ५०० रुपये यात जमा करणार आहात. आता समजा मे महिन्याच्या ५ तारखेला पहिला हप्ता जमा केला नाही तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत तुमची एकूण राशी ही फक्त ५०० रुपये राहिल आणि याच रक्कमेवर तुम्हाला व्याज मिळेल. पाच तारखेनंतर जमा केलेली रक्कम मिळून एकूण रक्कम पुढच्या महिन्यात जोडले जाईल. तर जूनमध्ये ५ तारखेनंतर हप्ता (Installment) टाकल्यानंतर त्या महिन्यासाठी आपल्या खात्यात एकूण १००० रुपये होती आणि यावर व्याज मिळेल.

समजा जर प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आधी आपला हप्ता जमा कराल तर मे महिन्याच्या आत आपली एकूण रक्कम १००० रुपये समजली जाईल. आणि त्यावरच व्याज मिळेल. असेच पुढील महिन्याच्या ५ तारखेच्या आधी इंस्टॉलमेंट जमा केले तर एकूण रक्कम ५०० रुपये वाढत जाईल. जर तुम्ही पीपीएफ खात्यात प्रत्येक महिन्याऐवजी वर्षात एकदाच पैसे जमा करत असाल तर एप्रिल महिन्याच्या ५ तारखेला पैसे जमा करावे. कराण आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चपर्यंत असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी