PPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम, अन्यथा ३१ मार्चनंतर भरावा लागणार दंड

PPF and SSY Minimum Balance Rules : PPF आणि SSY व्याज दर आणि किमान शिल्लक नियम सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये दरवर्षी काही रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

३१ मार्चपूर्वी PPF किंवा सुकन्या समृद्धी खातेदारांनी हे काम त्वरित करा, अन्यथा अकाऊंट होईल बंद
PPF and SSY Interest Rates and Minimum Balance Rules   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुकन्या योजनेच्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी
  • ३१ मार्चला बसू शकतो धक्का
  • एक हजार रुपये दंड भरावा लागणार

मुंबई : तुमचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या आर्थिक वर्षात या दोन्ही योजनांतर्गत पैसे जमा केले नसल्यास, काही रुपये लवकरच जमा करा. तुम्ही असे न केल्यास, तुमची खाती बंद केली जाऊ शकतात आणि तुम्हाला पुन्हा सुरू करण्यासाठी दंड भरावा लागेल. (PPF and SSY Interest Rates and Minimum Balance Rules )

अधिक वाचा : Accenture कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार, 19,000 कर्मचार्‍यांना एका झटक्यात काढणार
 

नियम काय आहेत?

नवीन नियमानुसार, या दोन्ही खात्यांमध्ये किमान रक्कम असणे आवश्यक आहे आणि या वर्षासाठी त्यात पैसे ठेवण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. ही रक्कम एका आर्थिक वर्षात जमा करणे आवश्यक आहे, कारण तसे न केल्यास खाते बंद होतेच, शिवाय दंडही भरावा लागतो. याशिवाय या खात्यावर कर्ज मिळणार नाही. तुम्ही या खात्यातून पैसेही काढू शकणार नाही.


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये वर्षभरात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. जर शेवटच्या तारखेपर्यंत या खात्यात पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला दरवर्षी 50 रुपये दंड भरावा लागेल. पीपीएफ खात्यात 15 वर्षांचे लॉक-इन आहे, परंतु कार्यकाळ संपण्यापूर्वी कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधा आहे. सध्या PPF खात्यावर ७.१% व्याज मिळत आहे.

अधिक वाचा : Aadhar कार्डधारकांना सरकारने दिला दिलासा… आता या तारखेपर्यंत करू शकणार मतदार ओळखपत्र लिंक


सुकन्या समृद्धी योजना (SSY)

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये जमा करावे लागतात आणि हे पैसे जमा न केल्यास 50 रुपये दंड भरावा लागतो. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक तिचे खाते उघडू शकतात आणि ही खाती वयाच्या 21 वर्षांपर्यंत किंवा मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत आणि लग्न होईपर्यंत वैध असतात. सुकन्या समृद्धी योजना खात्यावर सध्या ७.६% व्याज मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी