रिटायरमेंटआधी कोट्यधीश बनायचे आहे? पीपीएफमधील दरमहा ७५०० रुपयांची गुंतवणूक बनेल १.३६ कोटी, पाहा कसे ते

काम-धंदा
Updated Apr 29, 2021 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

PPF Investment: कोट्यधीश बनण्यासाठी नियमित गुंतवणुकीचे महत्त्व मोठे आहे. यात कोणतेही मोठे तंत्रज्ञान नाही, हे एक गणिती सूत्र आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडाविषयी तुम्हाला ज्ञान नसेल तरी तुम्ही कोट्यवधी रु

 PPF will make you crorepati
पीपीएफ मधील गुंतवणुकीने तुम्ही व्हाल कोट्यधीश 

थोडं पण कामाचं

  • पीपीएफमधील दरमहा गुंतवणूक
  • ७.१ टक्के व्याज
  • दीर्घ कालावधीसाठी गुंतवून व्हा कोट्यधीस

नवी दिल्ली : कोट्यधीश व्हावे हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटत असते. त्यासाठी आवश्यकता असते नियमित गुंतवणुकीची. यात कोणतेही मोठे तंत्रज्ञान नाही, हे एक गणिती सूत्र आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडाविषयी तुम्हाला ज्ञान नसेल तरी तुम्ही कोट्यवधी रुपये फंड उभा करू शकता. यासाठी तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात म्हणजे पीपीएफमध्ये (PPF) दर महिन्याला काही रक्कम जमा करावी लागेल. मात्र त्यासाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करायची ते लक्षात घेतले तर रिटायरमेंटआधीच तुम्ही कोट्यधीश बनाल.

पीपीएफ आहे दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय 


Public Provident Fund म्हणजेच ( PPF) पीपीएफ हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय समजला जातो. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाकाठी १.५ लाख रुपयांपर्यत गुंतवणूक करू शकता. म्हणजेच दर महिन्याला १२,५०० रुपये. जर तुम्हाला कोट्यधीश व्हायचे असेल तर तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की दर महा किती गुंतवणूक केली पाहिजे आणि किती काळ केली पाहिजे.

पीपीएफवर ७.१ टक्के व्याज


सध्या पीपीएफवर सरकार ७.१ टक्के वार्षिक व्याज देते आहे. यामध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. या हिशोबाने दर महिन्याला गुंतवलेल्या १२,५०० रुपयांचे मूल्य १५ वर्षांनी ४०,६८,२०९ रुपये इतके होईल. यामध्ये गुंतवणूक २२.५ लाख रुपयांची आहे आणि व्याज १८,१८,२०९ रुपयांचे.

एक कोटी रुपये असे होतील जमा

केस नंबर १ -


समजा तुम्ही ३० वर्षांचे आहात आणि पीपीएफमधील गुंतवणूक सुरू केली आहे. १२,५०० रुपये दर महा १५ वर्षांसाठी पीपीएफ मध्ये गुंतवल्याने तुमच्याकडे ४०,६८,२०९ रुपये येतील. आता तुम्ही हे पैसे काढू नका, ५ - ५ वर्षांच्या कालावधीसाठी पीपीएफमधील गुंतवणूक वाढवत जा. म्हणजेच १५ वर्षांनी ५ वर्षे आणि गुंतवणूक सुरू ठेवा, म्हणजे २० वर्षांनी ही रक्कम होईल ६६,५८,२८८ रुपये. २० वर्षे झाल्यावर पुन्हा ५ वर्षांसाठी कालावधी वाढवा. म्हणजे २५ वर्षांनी ही रक्कम होईल १,०३,०८,०१५ रुपये. म्हणजेच ३० वर्षी पीपीएफ मध्ये १२,५०० रुपयांच्या गुंतवणुकीने ५५ वर्षी तुम्ही कोट्यधीश व्हाल. 

केस नंबर २ -


जर तुम्ही १२,५०० रुपयांऐवजी थोडी कमी रक्कम दरमहा पीपीएफमध्ये गुंतवू इच्छित असाल मात्र ५५ वर्षीच कोट्यधीश व्हायचे असेल तर तुम्हाला लवकर गुंतवणूक सुरू करायला हवी. 

समजा तुम्ही २५व्या वर्षी १०,००० रुपयांची गुंतवणूक दरमहा पीपीएफमध्ये सुरू केली तर ७.१ टक्क्यांप्रमाणे १५ वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य होईल ३२,५४,५६७ रुपये. आता याला ५ -५ वर्षांनी वाढवत जा. २० वर्षांनी होतील ५३,२६,६३१ रुपये, २५ वर्षांनी होतील ८२,४६,४१२ रुपये आणि ३० वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य असेल १,२३,६०,७२८ रुपये. म्हणजेच ५५ वर्षी तुम्ही व्हाल कोट्यधीश.

श्रीमंत होण्यासाठी नियमित गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी