Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अटीमुळे 'वंचितां'ची संख्या वाढणार, फेर सर्व्हेक्षणात लाभार्थींच्या घरात पंखा, फ्रिज आढळल्याने नाव बाद

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्यांना राहण्यासाठी घर नाही, अशा व्यक्तींना घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी केंद्राकडून अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.

Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अटीमुळे 'वंचितां'ची संख्या वाढणार, फेर सर्व्हेक्षणात लाभार्थींच्या घरात पंखा, फ्रिज आढल्याने नाव बाद
Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अटीमुळे 'वंचितां'ची संख्या वाढणार, फेर सर्व्हेक्षणात लाभार्थींच्या घरात पंखा, फ्रिज आढल्याने नाव बाद  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • प्रधानमंत्री आवास योजना केंद्र सरकार महत्वाकांक्षी योजना
  • पक्के घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते
  • अनेक अटीमुळे अनेकांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.

Pradhan Mantri Awas Yojana : मुंबई : केंद्रातील मोदी सरकारची  (Modi Sarkar) महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास (PMAY) योजनेचा लाभ घेणं नागरिकांना मोठं आव्हानात्मक ठरत आहे.  योजनेचा लाभ पूर्वी फक्त गरीब वर्गासाठी होता. पण, आता गृहकर्जाची रक्कम वाढवून शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही त्याच्या कक्षेत आणले आहे. सुरुवातीला, PMAY मध्ये गृहकर्जाची रक्कम 3 ते 6 लाख रुपयांपर्यंत होती, ज्यावर व्याज अनुदान दिले जात होते, आता ते 18 लाख रुपये करण्यात आले आहे. असे सांगत असताना सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) ग्रामीण (Rural) भागात ग्रामपंचायतीकडून होत फेर सर्वेक्षणात अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्याला कारणही असच आहे. ते म्हणजे या सर्व्हेक्षणामध्ये असलेल्या विविध अटी आणि शर्ती. ग्रामीण भागात या योजनेंच्या अंतर्गत संभाव्य लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये ज्यांच्या घरात पंखा, फ्रिज यासारख्या वस्तू आढळल्या अशांना या यादीतून वगळण्यात आले आहे. (The number of 'disadvantaged' will increase due to the conditions of Pradhan Mantri Awas Yojana.)

पक्क्या घरासाठी शासनाचे अनुदान

केंद्र सरकारने देशातील सर्व लोकांना घरे देण्याच्या उद्देशाने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना 3 टप्प्यात विभागली आहे. योजनेचा पहिला टप्पा जून 2015 मध्ये सुरू झाला होता, जो मार्च 2017 मध्ये संपुष्टात आला होता. दुसरा टप्पा एप्रिल 2017 पासून सुरू झाला आणि मार्च 2019 मध्ये संपला. योजनेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा एप्रिल 2019 मध्ये सुरू करण्यात आला आणि मार्च 2022 पर्यंत सर्वांना घरे देऊ योजना बंद करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत ज्यांना राहण्यासाठी पक्के घर नाही, अशा व्यक्तींना  घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी केंद्राकडून अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तुमच्या घरी साधा पंखा जरी असला तरी देखील तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारच्या तेवीस अटी घालण्यात आल्या आहेत. 

कसे मिळेल अनुदान

PMAY लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 55 वर्षे असावे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपये निश्चित केले आहे. LIG (कमी उत्पन्न गट) चे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख दरम्यान असावे. आता 12 ते 18 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लोकही याचा लाभ घेऊ शकतात. सर्वप्रथम, अनुदानाबाबत गृहकर्ज देणाऱ्या बॅंकेशी संपर्क साधावा. तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज आधी सेंट्रल नोडल एजन्सीला पाठवला जाईल. मंजूर झाल्यास, एजन्सी अनुदानाची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकेला देईल. ही रक्कम तुमच्या कर्ज खात्यात येईल.

प्रशासनाकडून फेरसर्व्हेक्षण

राज्यातील लाखो लोकांना या योजनेतील अटींचा फटका बसला आहे. चार वर्षांपूर्वी विविध ग्रामपंचायतींच्या वतीने आपल्या गावातील लाभार्थ्यांची यादी तयार करून ती जिल्हा परिषदेमार्फत मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र योजनेसाठी असलेल्या अटींची चाळणी लावत यातील अनेक लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच ही यादी पुन्हा एकदा फेर सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहाण्याची शक्यता आहे.

काय आहेत अटी?

आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल 23 प्रकारच्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्यातील प्रमुख अटी म्हणजे, अर्जदाराला स्वता:च्या मालकीचे पक्के घर नसावे, मातीच्या घरात जर फ्रिज, कुलर, फॅन अशी उपकरणे असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या व्यक्तीच्या घरात दुचाकी, किंवा चारचाकी आहे, अशा व्यक्तींना देखील अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच तुमच्या घरी जर कृषीशी संबंधित काही अवजारे असतील किंवा सिंचनाची सोय असेल तरी देखील तुमचा अर्ज लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी