'या' सरकारी योजनेत अवघ्या १२ रुपयांत मिळवा १२ लाखांचा विमा

काम-धंदा
Updated May 20, 2020 | 19:27 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एका पाण्याच्या बाटलीच्या किमतीपेक्षा कमी किमतीत म्हणजेच अवघ्या १२ रूपयात प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना उपलब्ध आहे.

Pradhanmantri Surkasha Bima Yojana
प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना  

थोडं पण कामाचं

  • प्रधानमंत्री विमा योजना अवघ्या १२ रुपयात
  • इतर विमा योजनेपेक्षा प्रधानमंत्री विमा विकास योजना फायदेशीर
  • १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते योजनेचा लाभ

नवी दिल्ली: सध्याच्या महागाईच्या काळात १२ रुपयात काय मिळू शकेल? तुम्ही म्हणाल एक पाण्याची बाटली किंवा एक वडापाव. पण फक्त हेच नाही तर केंद्र सरकारची वर्षभरासाठीची अपघात विमा योजना देखील या किमतीत उपल्बध होणार आहे. हा विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)च्या अंतर्गत मिळेल. या अपघात विमा योजनेचा सर्वाधिक फायदा हा समाजातील गरीब आणि अत्यंत कमी मिळकत असणाऱ्या वर्गातील लोकांना मिळणार आहे. सदरील योजना भारत सरकारतर्फे चालवण्यात येत आहे. 

या योजनेअंतर्गत लाभर्थ्याला अपघातात मृत्यू/ जखमी झाल्यास एका वर्षाचे विमा संरक्षण मिळेल या योजनेला प्रत्येक वर्षाला पुनकार्यान्वित(रिन्यू) करता येऊ शकेल. या योजनेचा लाभ १८ ते ७० वर्षे वयोगटातील लोक घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभर्थ्याचे बँकेचे बचत खाते असणे आवश्यक आहे. जर लाभर्थ्याने आत्महत्या केली तर या योजनेचा फायदा मिळू शकत नाही. याशिवाय किरकोळ अपघात झाल्यास या योजनेचा फायदा मिळू शकत नाही. मात्र लाभर्थ्याची जर हत्या झाली असेल तर विम्याचा फायदा नातेवाईकांना मिळू शकतो.

या योजनेअंतर्गत अपघातात कायमस्वरुपी अंपगत्त्व किंवा मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. तर तात्कालिक स्वरुपात अपगंत्व आले असल्यास एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. 

प्रधानमंत्री विमा सुरक्षा (PMSBY)योजनेचे फायदे

  1. या योजनेअंतर्गत विमा केलेला व्यक्ती इच्छेनुसार केव्हाही विमा सुरु ठेवू शकतो अथवा बंद करु शकतो. 
  2. या योजनेअंतर्गत विमा केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ज्या पद्धतीने कुटुंबियांना दावा करण्यात आलेल्या रक्कमेचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे विमाधारक व्यक्तीचा साक्षीदारासही दावा करण्यात आलेली रक्कम मिळू शकते. 
  3. योजनेअंतर्गत विमा करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास साक्षीदारास २ लाख रुपये देण्यात येतात.
  4. दुसऱ्या विमा योजनेच्या तुलनेत अत्यंत कमी दरात ह्या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळते.     
  5. या योजनेअंतर्गत नेहमीसाठी अपगंत्व जसे दोन्ही डोळ्यांची पुर्णपणे दृष्टी जाणे. दोन्ही हात आणि पाय निकामी होणे या स्थितीत २ लाखांचे विमा संरक्षण मिळते. 
  6. या योजनेअंतर्गत बँक खात्यातून प्रिमिअमद्वारे थेट ऑटो-डेबीटची सुविधा आहे. याद्वारे नियमितपणे रक्कम भरण्याविषयी आता काळजी असणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी