LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक डोस, एलपीजी सिलिंडरच्या किंमत वाढली 

दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 769 रुपये होणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या वेबसाइटवर किंमत वाढीबाबत कोणतेही अद्ययावत झाले नसले तरी एएनआय या वृत्तसंस्थेने किंमतीतील वाढीचा हवाला दिल

price of lpg gas cylinder hiked by rs 50 per cylinder
LPG Cylinder Price: एलपीजी सिलिंडरच्या किंमत वाढली   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसला आहे.
  • एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे सामान्य माणूस असाह्य झाला आहे,
  • दुसरीकडे आता एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाल्याला दुहेरी दणका सर्वसामान्यांना बसला आहे.

नवी दिल्ली :  महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसला आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे सामान्य माणूस असाह्य झाला आहे, तर दुसरीकडे आता एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाल्याला दुहेरी दणका सर्वसामान्यांना बसला आहे. आज मध्यरात्री 12 वाजेपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्लीत याची किंमत 769 रुपये असेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या वेबसाइटवर किंमतवाढीबाबत कोणतेही अपडेट दिले नसले तरी एएनआय या वृत्तसंस्थेने किंमतीतील वाढीची बातमी दिली आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. काही ठिकाणी त्याचे भाव 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मध्य प्रदेशात प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. मुंबईत पेट्रोल 95 रुपयांना विकले जात आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत महागाईत लक्षणीय वाढ झाली आहे. या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीतील ही दुसरी वाढ आहे. ४ फेब्रुवारीला गॅस सिलिंडर्सही वाढविण्यात आले. 14 किलो विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली. 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीची किंमत बदलते. यावेळी 1 फेब्रुवारी रोजी व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ करण्यात आली होती, परंतु घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु ४ फेब्रुवारी रोजी व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत प्रति सिलिंडर सहा रुपये कमी करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी