FD Rate Hike : बँकांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, 'या' 4 बँकांनी एकाच दिवसात वाढवले एफडीवरील व्याजदर

FD interest rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या दोन महिन्यांत रेपो दरात (Repo rate) तीनदा वाढ केली आहे. यानंतर बँकांमध्ये बचत योजनांवरील किंवा मुदतठेवींवरील व्याजदर (Interest rate) वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील व्याजदर वाढत आहेत. खासगी आणि सरकारी बँकां ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ करताना दिसत आहेत.

Bank Interest rates
बॅंकेच्या मुदतठेवीवरील व्याजदरात वाढ 
थोडं पण कामाचं
  • रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या दोन महिन्यांत रेपो दरात (Repo rate) तीनदा वाढ केली
  • विविध बँकांमधील एफडीवरील व्याजदरात वाढ
  • आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि कोटक महिंद्रा बँक या बॅंकांनी वाढवले एफडीवरील व्याजदर

FD Interest rate hike:नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या दोन महिन्यांत रेपो दरात (Repo rate) तीनदा वाढ केली आहे. यानंतर बँकांमध्ये बचत योजनांवरील किंवा मुदतठेवींवरील व्याजदर (Interest rate) वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील व्याजदर वाढत आहेत. खासगी आणि सरकारी बँकां ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ करताना दिसत आहेत. व्याजदर वाढल्यामुळे एकीकडे कर्जे महाग होत असली तरी मुदतठेवींवरील व्याजदर वाढत असल्यामुळे ग्राहकांना फायदा होतो आहे. (Private and PSU banks hike the FD interest rates as repo rate is hiked)

अधिक वाचा : Cuttputlli teaser launch: 'कटपुतली' सिनेमाचा टीझर रिलीज, अक्षय कुमार उलगडणार सीरियल किलरचा माईंड गेम

वेगवेगळ्या तारखेपासून दरवाढ लागू 

एकाच दिवसात चार मोठ्या बँकांनी व्याजदर वाढवण्याची घोषणा केल्याने ग्राहकांची अधिकच चांदी झाली. मात्र, व्याजदरातील ही वाढ वेगवेगळ्या तारखांपासून लागू झाली आहे. ज्या बँकांनी व्याजदरात बदल केला आहे त्यात आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे.

एचडीएफसी बँक (HDFC Bank)

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडी दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वीही बँकेने एफडीवरील व्याजात वाढ केली होती. बँकेने 18 ऑगस्ट 2022 पासून नवीन दर लागू केले आहेत. बँकेने केवळ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरच व्याज वाढवले ​​आहे. आता एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळेल.

अधिक वाचा : Vastu Tips for home: रात्री झोपताना बेडरूममध्ये पती-पत्नीने करू नये 'या' चुका, अन्यथा...

पंजाब नॅशनल बँक (PNB)

पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेचे नवे दर 17 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, एक वर्षापासून तीन वर्षांपर्यंत आणि 5 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या मुदतीसह एफडीचा दर वाढवण्यात आला आहे. 10 वर्षांपर्यंतच्या एफडीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

आयडीएफसी बँक (IDFC Bank)

इतर बँकांप्रमाणेच IDFC बँकेनेही 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. नवीन दर 16 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. IDFC बँकेत, 2 वर्ष 1 दिवस ते 749 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 6.90 टक्के व्याज आहे. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाते.

अधिक वाचा : पुण्यात Income Tax अधिकाऱ्याच्या घरी चोरी, मोलकरीणच निघाली मास्टरमाईंड

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)

कोटक महिंद्रा बँकेने एफडीवरील व्याजदर 390 दिवसांवरून 3 वर्षांपर्यंत वाढवला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होतील. बँकेने व्याजदर वाढीमध्ये 390 दिवसांपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या एफडीचा समावेश केला आहे. बँकेने 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD साठी 2.50 ते 5.90 टक्के व्याज जाहीर केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3 ते 6.40 टक्के व्याज मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी