आयुष्यातील सात महत्त्वाच्या टप्प्यांवर पीएफचा पैसा येतो कामी; जाणून घ्या कधी अन् किती मिळतो फंड

काम-धंदा
Updated Apr 02, 2021 | 18:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

नोकरदार वर्ग आपल्या पगारातील एक हिस्सा पीएफच्या रुपात जमा करतात. पीएफ खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा परत काढू शकतो.

Provident fund give money on seven steps of life
घर बांधण्यासाठी पीएफचा पैसा ठरतो महत्त्वाचा  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • पीएफच्या पैशातून गृहकर्ज फेडता येणार.
  • शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते.
  • लग्नासाठी भविष्य निर्वाह निधी येतो कामी.

नोकरदार वर्ग आपल्या पगारातील एक हिस्सा पीएफच्या रुपात जमा करतात. पीएफ खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा परत काढू शकतो. विशेष म्हणजे या पैशांवर व्याजदर चांगले मिळत असते. पीएफ परंतु तुम्हाला माहिती आहे का? पीएफच्या खात्यात तुम्ही तुमचा पूर्ण पैसा काढू शकत नाहीत. खात्यातील पूर्ण पैसा तुम्ही काही परिस्थितीमध्येच काढू शकतात. आपल्या आयुष्यात अनेक टप्पे येत असतात, या महत्त्वाच्या टप्प्यांवर आपल्याला पैशांची गरज लागत असते. अशाच वेळी तुम्हाला पीएफमधून पैसे मिळत असतात.. चला तर जाणून घेऊ कोणत्या परिस्थितीत आपल्याला पूर्ण पैसा मिळतो. 

गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी -


जर तुम्ही आपल्या परिवारातील सदस्यांचा उपचार करायचा असेल आणि यासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकतात. पण यासाठी तुम्ही एक महिन्यांपेक्षा जास्त काळ आजारपण राहिले असलाल तर त्याची माहिती द्यावी लागेल. यासह काही आवश्यक गोष्टींची पुर्तता करावी लागते. खातेधारकाला आपल्या एम्प्लॉयर किंवा ईएसआयकडून एक मान्यता प्रमाणपत्र द्यावे लागेल. या प्रमाणपत्रात घोषित केलेले असते की, ज्याला मेडिकल उपचार पाहिजे, तेव्हापर्यंत (ESI)ईएसआयची सुविधा नाही दिली जाणार किंवा त्याला ईएसआयची सुविधा नाही मिळणार. 


लग्न किंवा शिक्षणासाठी मिळेल पैसा


तुमच्या कुटुंबातील कोणाच्या लग्नासाठी पैसा लागत असेल तर तुम्ही त्यातून पैसा काढू शकतात. दरम्यान यासाठी तुमची सर्विस हिस्ट्री म्हणजे कार्याचा काळ किती आहे तो पाहिला जातो. यात तुम्हाला कमीत-कमी ७ वर्ष नोकरी असली पाहिजे. जर शिक्षणासाठी तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या एम्पलायरकडून फॉर्म-३१च्या अंतर्गत अर्ज करावा लागेल. या स्थितीत तुम्ही फक्त ५० टक्के पैसे काढू शकतात. 


प्लॉट करता येईल खरेदी  


जर तुम्ही प्लॉट खरेदी करण्याची योजना करत असाल तर तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून पैसा काढू शकतात. पण त्यासाठी एक अट आहे, ती अट म्हणजे घेण्यात येणारा प्लॉट तुमच्या कुंटुबातील कोणी एका सदस्याच्या नावावर घ्यावा लागेल, आणि त्यासाठी ५ वर्ष सेवा असणं आवश्यक आहे. यासह प्लॉटच्या कागदपत्रांची माहितीही द्यावी लागेल. यात असे दाखवलेले असावे की या जागेवर कोणतेही वाद-विवाद नाहीत. तर तुम्ही एकाचवेळी पूर्ण पैसा काढू शकतात.


घराचे स्वप्न होईल पूर्ण 


तुम्ही जर घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकतात. या दरम्यान तुम्ही पगाराच्या ३६ वेळा पैसा काढू शकतात. गृहकर्ज फेडण्यासाठीही तुम्ही नोकरीच्या १० वर्षानंतर पीएफ काढू शकतात. यासह तुम्हाला जर घराचे नूतनीकरण करायचे असेल तर तुम्ही पीएफमधून पैसा काढू शकतात, हा पैसा पगाराच्या १२ पट असतो.  

निवृत्तीच्या वेळेस मिळेल पैसा

 

तुमचे वय जेव्हा ५४ वर्ष होईल, तेव्हा तुम्ही (EPF) ईपीएफच्या शिल्लक रक्कमेतून ९० टक्के पैसा काढू शकतात. परंतु तुम्ही हा पैसा फक्त एकदाच काढू शकतात. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी