पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये  मिळणार आता दुहेरी व्याज! फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जबरदस्त फायदे मिळवा

काम-धंदा
Updated Apr 09, 2023 | 18:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Public Provident Fund (PPF): भविष्य निर्वाह निधीमध्ये आयकर कलम 80 C अंतर्गत, 1.5 लाख रुपयेपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत उपलब्ध करण्यात आली आहे. PPF मध्ये वर्षातून 12 वेळा तुम्ही रक्कम जमा करू शकता, आणि याची कमाल मर्यादा रु. 1.5 लाख इतकी आहे. मात्र, विवाहित गुंतवणूकदारांसाठी इथे एक खास गोष्ट आहे. 

विवाहित गुंतवणुकीदारांसाठी ट्रिक्स 
PPF मध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारे फायदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे. पण, तुम्ही ही गुंतवणूक आणखीन वाढवू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज देखील दुप्पट होऊ शकते.
  • विवाहित गुंतवणुकीदारांसाठी ट्रिक्स 
  • ही गुंतवणूक सरकारमान्य असून ती E-E-E श्रेणींमध्ये ठेवण्यात आली आहे.  E-E-E श्रेणी म्हणजे तुमची गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम तिन्ही पूर्णपणे करमुक्त आहे.

Public Provident Fund (PPF) Interest: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणुकीदारांसाठी बचतीचे अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. भारतातील बहुतांश नागरिक यामध्ये गुंतवणूक करतात. विशेष म्हणजे ही गुंतवणूक सरकारमान्य असून ती E-E-E श्रेणींमध्ये ठेवण्यात आली आहे.  E-E-E श्रेणी म्हणजे तुमची गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम तिन्ही पूर्णपणे करमुक्त आहे. पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे. पण, तुम्ही ही गुंतवणूक आणखीन वाढवू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज देखील दुप्पट होऊ शकते. चला याबद्दल समजून घेऊया. (Public Provident Fund (PPF) will now get double interest!)

अधिक वाचा : दहा दिवसांत कमी करा वजन

PPF मध्ये कशी होते दुप्पट गुंतवणूक?

PPF मधील आयकर कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे. PPF मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. 1.5 लाख असून, तुम्ही वर्षातून 12 वेळा यात पैसे जमा करू शकता. मात्र, विवाहित गुंतवणूकदारांसाठी येथे एक खास गोष्ट देण्यात आली आहे.  तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने PPF उघडल्यास, तुम्ही एका आर्थिक वर्षात गुंतवणूक दुप्पट करून, दोन्ही खात्यांद्वारे दुहेरी व्याज मिळवू शकता. 

PPF मध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारे फायदे

आर्थिक तज्ज्ञांनुसार, आपल्या जोडीदाराच्या नावाने पीपीएफ खाते उघडून गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांऐवजी पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. जेणेकरून गुंतवणुकीदाराकडे दोन खाती असतील. ज्यामुळे तो, त्याच्या खात्यात 1.5 लाख रुपये जमा करू शकतो, आणि त्याचवेळी, दुसरीकडे भागीदाराच्या नावावर 1.5 लाख रुपये जमा करू शकतो. असे केल्याने त्याला दोन्ही खात्यांवर वेगवेगळे व्याज मिळणार आहेत. यादरम्यान, कोणत्याही एका खात्यावर 1.5 लाख रुपयांपर्यंत त्याला कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. या प्रकरणात, तुमच्या PPF गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट करून 3 लाख रुपये केली जाईल.  तसेच ही गुंतवणूक E-E-E श्रेणीमध्ये असल्याने, गुंतवणूकदाराला PPF व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कर सूट देखील मिळेल.

अधिक वाचा : बीडमधील सावरकर गौरव यात्रेला प्रीतम आणि पंकजाची दांडी

आयकर कलम 64 अंतर्गत, तुम्ही तुमच्या पत्नीला दिलेल्या कोणत्याही रकमेतून किंवा भेटवस्तूतून मिळणारे उत्पन्न तुमच्या उत्पन्नात जोडले जाईल,  जे EEE मुळे पूर्णपणे करमुक्त असणार आहे, क्लबिंग तरतुदींचा कोणताही प्रभाव यात पडणार नाही.

विवाहित गुंतवणुकीदारांसाठी ट्रिक्स 

जेव्हा  भविष्यात तुमच्या जोडीदाराचे PPF खाते मॅच्युअर  होईल, तेव्हा तुमच्या भागीदाराच्या PPF खात्यातील तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न वर्षानुवर्षे तुमच्या उत्पन्नात जोडले जाईल. त्यामुळे, हा पर्याय विवाहित लोकांना पीपीएफ खात्यात त्यांची गुंतवणूक दुप्पट करण्याची सुवर्णसंधी प्रदान करतो.  एप्रिल ते जून या तिमाहीसाठी PPF व्याज दर 7.1 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी