Public sector banks profit jumps 65 percent in quarter 3, here is how Bank of Maharashtra and other banks performed : भारतात 12 सरकारी बँकांना 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 29 हजार 175 कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात झालेली ही 65 टक्क्यांची वाढ आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक चांगली कामगिरी केली.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने 139 टक्के जास्त नफा कमावला. पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत 775 कोटी रुपयांचा नफा कमावला.
कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या युको बँकेने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत 653 कोटी रुपयांचा नफा कमावला. हा ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीच्या तुलनेत 110 टक्के जास्त आहे.
मुंबईत मुख्यालय असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत 2245 कोटी रुपयांचा नफा कमावला. हा ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीच्या तुलनेत 107 टक्के जास्त आहे.
चेन्नईत मुख्यालय असलेल्या इंडियन बँकेने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत 1396 कोटी रुपयांचा नफा कमावला. हा ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीच्या तुलनेत 102 टक्के जास्त आहे.
देशातील 12 सरकारी बँकांना 2021-22 या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 17 हजार 729 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला होता.
आर्थिक वर्ष 2022-23च्या एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत देशातील 12 सरकारी बँकांनी 70 हजार 166 कोटी रुपयांचा एकूण नफा कमावला. याआधी आर्थिक वर्ष 2021-22च्या एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत देशातील 12 सरकारी बँकांनी 48 हजार 983 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. सरकारी बँकांना 2021च्या नऊ महिन्यांच्या तुलनेत 2022च्या नऊ महिन्यांत 43 टक्के जास्त नफा झाला.
भारतातील 12 सरकारी बँकांना आर्थिक वर्ष 2022-23च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत 15 हजा 306 कोटी रुपयांचा नफा झाला. नंतर जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत 25 हजार 685 कोटी रुपयांचा नफा झाला. यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाही सरकारी बँकांना 29 हजार 175 कोटी रुपयांचा नफा झाला.