PUC Rate hike | महाराष्ट्रातील पीयूसी चाचणी दर झाले महाग...जाणून घ्या नवीन दर

New PUC rate : महाराष्ट्रातील पीयूसी दरात वाढ (PUC rate) झाली आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण (Air Pollution) कमी करण्यासाठी वाहनांची चाचणी केली जाते. वाहनांद्वारे किती प्रदूषण होते आहे किंवा हे प्रदूषण नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्यासाठी वाहनांची प्रदूषणासंदर्भातील एक चाचणी केली जाते. महाराष्ट्रातील पीयूसीचे दर (Maharashtra PUC rate) आता वाढले आहेत.

PUC rate hike in Maharashtra
महाराष्ट्रात पीयूसी दर वाढ 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील पीयूसी चाचणी दरात वाढ
  • परिवहन आयुक्त कार्यालयाकडून नवे परिपत्रक जाहीर
  • विविध वाहनांसाठीचे सुधारित पीयूसी दर जाहीर

PUC Rates in Maharashtra:  मुंबई : महाराष्ट्रातील पीयूसी दरात वाढ (PUC rate)झाली आहे.  प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि 
वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण (Air Pollution) कमी करण्यासाठी वाहनांची चाचणी केली जाते. वाहनांद्वारे किती प्रदूषण होते आहे किंवा हे प्रदूषण नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्यासाठी वाहनांची प्रदूषणासंदर्भातील एक चाचणी केली जाते. या चाचणीला पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) (PUC) म्हणतात. पीयुसी करणारी केंद्रे पेट्रोल पंप, रस्त्यावर, मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी असतात. मोबाईल व्हॅनमध्ये ही केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून जाता येताच आपल्या वाहनाची प्रदूषण करणे सोपे होते.  महाराष्ट्रातील पीयूसीचे दर (Maharashtra PUC rate) आता वाढले आहेत. याबाबत एक परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. (PUC test rate hiked in Maharashtra)

अधिक वाचा : Maharashtra Cabinet Meeting on 28th april 2022 : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतले ९ महत्त्वाचे निर्णय

शासनाकडून पीयूसीसाठीचे परिपत्रक

परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून पीयूसी संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले आहे. यात मोटार वाहनांची वायूप्रदूषणाची चाचणी करण्यासंदर्भातील शुल्कवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वायू प्रदूषण नियंत्रण केंद्रांनी वाहनांच्या वायू प्रदूषण चाचणीसाठी आकारायच्या शुल्कात सुधारणा करून वाढीस मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 25 एप्रिल 2022 च्या निर्देशानुसार राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरात वाढ लागू करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : Bacchu Kadu । पालकमंत्री बच्चू कडू यांना जामीन मंजूर; पुढील सुनावणी 9 मे रोजी

नव्या परिपत्रकानुसार वाहनांच्या पीयूसी चाचणीसाठीचे सुधारित दर आता असे असणार आहेत. 

पीयूसीचे नवे सुधारित दर -

वाहन प्रकार                                                             आधीचे दर                     सुधारित दर

दुचाकी वाहनासाठी                                                     35 रुपये                         50 रुपये
पेट्रोलवरील तीनचाकी वाहने                                          70 रुपये                         100 रुपये
पेट्रोल, एलपीजी, सीएनजीवरील चार चाकी वाहने              90 रुपये                         125 रुपये
डिझेलवरील वाहने                                                      110 रुपये                       150 रुपये

अधिक वाचा :  Nana Patole | महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न 2 वर्षांपासून सुरू - नाना पटोले

लगेच लागू होणार नवे दर

वायू प्रदूषण चाचणीसाठी शासनाने लागू केलेले सुधारित दर तात्काळ प्रभावाने अंमलात आणले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या वाहनाची पीयूसी चाचणी करणार असाल तर सुधारित दर द्यावे लागतील हे लक्षात ठेवा.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे सोप्प झालंय

आता लोकांना ड्रायव्हिंग शिकवण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. नागपूरच्या तिन्ही आरटीओमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्यांसाठी व्हर्च्युअल सरावाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही यंत्रणा विशेषत: अशा लोकांसाठी आहे ज्यांचे वाहन चालविण्याचे कौशल्य फारसे चांगले नाही. नागपूर, सीटी, पूर्व आणि ग्रामीण या तीन आरटीओंना या प्रणालीला प्रत्येकी दोन सिम्युलेटर देण्यात आले आहेत. जेणेकरून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणाऱ्या अर्जदारांना कोणतीही अडचण येऊ नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी