Pune | सारस्वत बॅंकेच्या चेअरमनवर फसवणुकीचा आरोप, पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण

Saraswat Bank Chairman | सारस्वत बॅंकेचे चेअरमन गौतम ठाकूर (Saraswat Bank chairman Gautam Thakur)आणि व्यवस्थापकीय संचालिका स्मिता संधाणे (Managing Director Smita Sandhane)यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police)गौतम ठाकूर आणि स्मिता संधाणे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार ही तक्रार एका न्यायदंडाधिकारी कोर्टाच्या आदेशावर दाखल करण्यात आली आहे. कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Saraswat Bank cheating case
सारस्वत बॅंकेच्या चेअरमनवर फसवणुकीचा गुन्हा 
थोडं पण कामाचं
  • पुण्यात सारस्वत बॅंकेविरोधात गुन्हा दाखल
  • सारस्वत बॅंकेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालिका यांच्यासह आठ जणांविरोधात तक्रार
  • फसवणुकीच्या प्रकरणात कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

Saraswat Bank | पुणे : सारस्वत बॅंकेचे चेअरमन गौतम ठाकूर (Saraswat Bank chairman Gautam Thakur)आणि व्यवस्थापकीय संचालिका स्मिता संधाणे (Managing Director Smita Sandhane)यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police)गौतम ठाकूर आणि स्मिता संधाणे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार ही तक्रार एका न्यायदंडाधिकारी कोर्टाच्या आदेशावर दाखल करण्यात आली आहे. कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सारस्वत बॅंकेचे चेअरमन आणि इतर सातजणांविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार फसवणुकीची केस (Cheating case) नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे. (Pune police registered alleged cheating case against Saraswat Bank chairman)

कोथरुड येथील केस

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार कोथरुडच्या रहिवासी असलेल्या स्मिता समीर पाटील यांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवली आहे. यानंतर सारस्वत बॅंकेचे चेअरमन गौतम ठाकूर, व्यवस्थापकीय संचालिका स्मिता संधाणे, चीफ मॅनेजर आनंद चाल्के, झोनल मॅनेजर्स पल्लवी साळी, रत्नाकर प्रभाकर, विश्रांतवाडी ब्रॅंच मॅनेजर अभिषेक भगत यांच्याविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

केव्हा घडले हे प्रकरण ?

या प्रकरणामागचे मूळ कारण एक खोटे किंवा बनावट ट्रान्झॅक्शन आहे. ही घटना २०१८ आणि २०२०च्या दरम्यान झाली होती. तक्रारदाराच्या कंपनीचे सारस्वत बॅंकेच्या विश्रांतवाडी शाखेत टर्म लोन अकाउंट होते. सारस्वत बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे की त्यांनी एक बनावट किंवा बोगस लोन अकाउंट बनवले आणि १३ ऑगस्ट २०१८ला कंपीकडे १३ कोटी रुपयांचा वन टाइम सेटलमेंटसाठीचा एक प्रस्ताव पाठवला. बॅंकेवर आरोप आहे की बॅंकेने टर्म लोन अकाउंटसाठी देण्यात आलेल्या चेकचा गैरवापर केला. बॅंकेवर आरोप आहे की त्यांनी खोट्या लोन अकाउंटसाठी २.५ कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन केले आहे.

सारस्वत बॅंकेचा विस्तार

सारस्वत बॅंक ही पुण्यातील एक प्रतिष्ठित बॅंक असून बॅंकेची स्थापना १९१८मध्ये झाली होती. बॅंकेच्या दाव्यानुसार ही देशातील सर्वात मोठी अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक आहे. बॅंकेचे कामकाज आणि व्यवसाय देशातील सहा राज्यांमध्ये आहे. यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. बॅंकेच्या वेबसाइटनुसार त्यांचा एकूण व्यवसाय ६७,००० कोटी रुपयांचा आहे. याचबरोबर देशभरात बॅंकेच्या २८३ शाखा आणि ३११ पेक्षा जास्त एटीएम आहेत.

सहकारी बॅंकांना ढिसाळ व्यवस्थापन आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणांना तोंड द्यावे लागते आहे. आरबीआयने अलीकडेच मुंबईतील पंजाब अॅंड महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर कारवाई केली होती. इतरही सहकारी बॅंकांवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

अर्थात या प्रकरणात अद्याप पोलिस तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर नेमके या प्रकरणात काय घडले हे अधिक स्पष्टपणे समोर येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी