Radhakishan Damani Loss : नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share Market)घसरणीमुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. मग ते सर्वसामान्य गुंतवणुकदार असो की यशस्वी दिग्गज गुंतवणुकदार असो, सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे. भल्या भल्यांना या घसरणीत आपली गुंतवणूक वाचवता आलेली नाही. डी-मार्ट या रिटेल चेनचे (D-Mart) मालक आणि दिग्गज गुंतवणुकदार राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) हे भारतातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणुकदारांपैकी एक समजले जातात. मात्र त्यांनादेखील शेअर बाजारातील या घसरणीचा मोठा धक्का बसला आहे. राधाकिशन दमानी यांचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 26,000 कोटी रुपयांनी खाली आला आहे. म्हणजेच त्यांना इतक्या प्रचंड रकमेचा फटका बसला आहे. ट्रेंडलाइन आणि कॉर्पोरेट डेटाबेस Ace Equity च्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. (Radhakishan Damani lost Rs 26,000 crores in share market crash in 3 months)
अधिक वाचा : Gold-Silver Rate Today,04 July 2022: सोने कडाडले, चांदीदेखील चमकली, पाहा ताजा भाव
जून 2022 च्या तिमाहीत राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये 14% ने घसरण झाली. eMarkets च्या अभ्यासानुसार, राधाकिशन दमानी यांचे पोर्टफोलिओ मूल्य 31 मार्च 2022 रोजी 1,73,822 कोटी रुपयांवर होते. त्यात मोठी घसरण होत ते 30 जून 2022 रोजी 1,47,534.47 कोटी रुपयांवर आले. म्हणजेच दमाणी यांना 26,287.53 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे किंवा त्यांच्या गुंतवणूक मालमत्तेत इतकी घसरण झाली आहे. ट्रेंडलाइनवर उपलब्ध माहितीनुसार, या अभ्यासात फक्त 14 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये दमानी यांची हिस्सेदारी 1% किंवा त्याहून अधिक आहे.
अधिक वाचा : Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांना मोठा झटका, 3 महिन्यांत झाले 8 हजार कोटींचे नुकसान
राधाकिशन दमाणी यांची मालकी असलेली मुख्य कंपनी आणि डी-मार्टची प्रवर्तक कंपनी असलेल्या अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवर्तक म्हणून राधाकिशन दमानी यांची या कंपनीत 65.2 टक्के हिस्सेदारी आहे. जून तिमाहीत अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्स 15 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. म्हणजेच कंपनीचे शेअर्स 3,999.45 रुपयांवरून 3,396.3 रुपये प्रति शेअरच्या पातळीपर्यंत घसरले आहेत. राधाकिशन दमाणी यांना इंडिया सिमेंट्सच्या शेअर्समध्ये सुमारे 208 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इंडिया सिमेंटचे शेअर्स 25 टक्क्यांहून अधिक घसरून 156.45 रुपयांवर आले. दमाणी यांची या कंपनीत 12.7 टक्के हिस्सेदारी आहे.
अधिक वाचा : ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड
राधाकिशन दमानी यांना त्यांच्या ट्रेंटमधील गुंतवणुकीत सुमारे 109.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पहिल्या तिमाहीत ट्रेंटचे शेअर्स 16 टक्क्यांनी घसरून 1074.45 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. याशिवाय, सुंदरम फायनान्स, मेट्रोपोलिस हेल्थकेअर, युनायटेड ब्रुअरीज, व्हीएसटी इंडस्ट्रीज, मंगलम ऑरगॅनिक्स, अॅस्ट्रा मायक्रोवेब प्रॉडक्ट्स या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत 38% पर्यंत घसरण झाली आहे.
शेअर बाजारातील घसरणीने सर्वसामान्य गुंतवणुकदार असो की दिग्गज गुंतवणुकदार असो सर्वांनाच झोडपून काढले आहे.