10वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, मध्य रेल्वेत २५३२ पदांची भरती

काम-धंदा
Updated Feb 23, 2021 | 16:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

रेल्वेने शिकाऊ उमेदवारांच्या २६३२ पदांच्या भरतीची सूचना काढली आहे. यासाठी किमान १०वी पास असणे आवश्यक असणार आहे.

Railway Announces vacancies for 10th pass
मध्य रेल्वे  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रेल्वेने शिकाऊ उमेदवारांच्या २५३२ पदांच्या भरतीच्या सूचना दिल्या आहेत
  • शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी सहा फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहे
  • रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख ४ मार्च असणार आहे

मुंबई. सरकारी नोकरिसाठी तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  रेल्वेने शिकाऊ उमेदवारांसाठी २५३२  रिक्तपदांच्या भरतीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी आजपासून अर्ज दाखल करता येऊ शकतात. ही प्रक्रिया सहा फेब्रुवारीपासूनच सुरू झाली आहे. त्याचा लाभ उमेदवारांना घेता येणार आहे.  

सेंट्रल रेल्वेत कॅरेज एँड वॅगन (कोचिंग) वाडी बंडरसाठी २५८ जागा, मुंबई-कल्याण डिझेल शेडसाठी ५३ जागा, कुर्ला डिझेल शेडसाठी साठ जागा आणि वरिष्ठ डीईई (टीआरएस) कल्याणसाठी १७९ जागा रिक्त आहेत. 

वरिष्ठ डीईआरई (टीआरएस) कुर्लाचे १९२ जागा, रेल वर्कशॉपसाठी ४१८ जागा, माटुंगा कार्यशाळेसाठी ५४७ जागा, एस एँड टी कार्यशाळा आणि भाईखळ्यात ६० पदे रिक्त आहेत. याव्यतिरिक्त भुसावळ कॅरेज एँड वॅगन डेपोसाठी १२२ जागा रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया मध्य रेल्वेने सुरू केली आहे. 

पाच मार्चपर्यंत  दाखल करू शकतो अर्ज 
 

पुणे कॅरेज आणि वॅगन डेपोत ३१ जागा, डिझेल लोको शेड मध्ये १२१ जागा, नागपूर इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये ४८ पदे, अंजनी कॅरेज अँड वॅगन डेपोत ६६ पदे, सोलापूर कॅरेज आणि वॅगन डेपोत ५८ पदे आणि कुर्डूवाड़ी वर्कशॉपसाठी २१ पदे रिक्त आहेत.  

या जागांसाठी उमेदवार सहा फेब्रुवारीपासून पाच मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी आरआरसीच्या ऑफिशिअल  संकेतस्थळाला (rrccr.com) भेट देऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण  करावी लागणार आहे. अर्जाची फी १०० रूपये असणार आहे.

ही असेल  किमान पात्रता

मध्य रेल्वेतील रिक्त पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १०वी पास असणार आहे. उमेदवार १०वीच्या परीक्षेत ५० टक्के मार्क घेऊन पास झालेले असावेत. याव्यतिरिक्त काही पदांसाठी १२वी पाससुद्धा पात्रता असणार आहे.

शिकाऊ उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ ते २४ वर्ष इतकी असणार आहे. यात ओबीसी वर्गासाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्ष, एससी/एसटीसाठी पाच वर्ष आणि दिव्यांगांसाठी त्यात दहा वर्षांची सुट दिली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी