Cancelled Trains List : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) दररोज लाखो प्रवासी लाखो किलोमीटरचा प्रवास करतात. लाखो लोकांच्या रोजच्या प्रवासाचे साधन आजही रेल्वे हेच आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक स्वस्त माध्यम म्हणून, सर्व वर्गातील लोकांच्या प्राधान्यक्रमात रेल्वे प्रवासाचे स्थान कायम आहे. रेल्वेने प्रवास करणे देखील खूप आरामदायी आहे. मात्र, कधी-कधी असेही घडते की, ट्रेन (Train) उशिराने किंवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच, काही वेळा ट्रेन वळवली जाते किंवा वेळापत्रक बदलले जाते. आजही अनेक गाड्या रद्द, वळवल्या आणि वेळापत्रक बदलण्यात आले. (Railway cancelled more than 200 trains today, check list)
देशात सध्या मान्सून सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी अनेकवेळा खराब हवामानामुळे रेल्वे वाहतुकीत अडचणी निर्माण होतात, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.
अधिक वाचा : Bullet Train : बुलेट ट्रेनच्या नावात बुलेट का आहे? पाहा त्यामागचे प्रमुख कारण आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे...
अशा स्थितीत आजही अनेक गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. आज 17 जुलै रोजी रेल्वेने 246 गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी 203 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून 43 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज 7 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर 6 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा : SBI Interest rates : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे...बॅंकेकडून व्याजदरात 10 बीपीएसची वाढ
आज देशात कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/ या लिंकवरून मिळू शकते. याशिवाय, आज कोणत्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत किंवा त्याचे वेळापत्रक बदलले आहे, या माहितीसाठी https://www.irctchelp.in/train-rescheduled-diverted-today-updates/ या लिंकवर क्लिक करा.
आता तुम्हाला रेल्वे तिकिटासाठी (Railway Ticket) कुठेही जाण्याची गरज नाही आणि एजंटचीही गरज भासणार नाही. रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. तत्काळ तिकिटांसाठी रेल्वेने आता नवीन अॅप म्हणजे आयआरसीटीसी तत्काल तिकिट अॅप ( IRCTC Tatkal Ticket App)लाँच केले आहे. हे अॅप फक्त आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या घरच्या आरामात क्षणार्धात तत्काळ तिकिटे बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पेमेंट करावे लागणार नाही.
अनेकवेळा असे घडते की, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो. मात्र अचानक ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाले आहे. या प्रकरणात, तुम्ही एकतर एजंटशी संपर्क साधा किंवा तत्काळ तिकिटासाठी प्रयत्न करा. पण तत्काळ तिकीट मिळवणेही सोपे नाही. अशा स्थितीत रेल्वेच्या या सेवेमुळे सर्वसामान्यांची सोय होणार आहे. IRCTC च्या प्रीमियम भागीदाराकडून कन्फर्म तिकिट या नावाने हे अॅप आणण्यात आले आहे.