Railway Employee DA Hike: नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने (Railway Board) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employee)आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike)वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ज्यांना सध्या 6 व्या वेतन आयोगांतर्गत (6th Pay Commission)पगार दिला जातो आहे अशा कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात एकरकमी 14 टक्के वाढ करण्यात येत आहे. डीएमध्ये जोरदार वाढीसह कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे. ती म्हणजे सरकारने डीएतील वाढीबरोबर कर्मचाऱ्यांना 10 महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णयही घेतला आहे. (Railway employees to get 14% DA hike Also will get 10 months arrear)
या कर्मचाऱ्यांना लवकरच ही वाढ मिळणार आहे. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना 10 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. रेल्वेने आपल्या कर्मचार्यांच्या थकबाकी डीएमध्ये एकाच वेळी दोनदा वाढ केली आहे. 14 टक्के वाढीमध्ये जुलै 2021 आणि जानेवारी 2022 साठीची महागाई भत्त्यातील वाढदेखील समाविष्ट आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळत होता. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2021 साठी 189 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी 2022 पासून त्यात पुन्हा 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढ आता 203 टक्क्यांवर पोचली आहे.
अधिक वाचा : घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सातवा आणि सहावा वेतन आयोगासंदर्भात वेतनात फरक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 7व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission)शिफारशींनुसार पगार दिला जातो, मात्र अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाअंतर्गतच पगार मिळत आहे. ही विषमता दूर करण्यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने आदेश जारी करण्यापूर्वी रेल्वे मंत्रालय आणि वित्त संचालनालयाची परवानगी घेतली होती. सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा आदेश जाहीर केला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार घसघशीत महागाई भत्ता याआधीच दिला आहे. अलीकडेच, 7 व्या वेतन आयोगांतर्गत, सरकारने पगार कर्मचार्यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला होता, त्यानंतर त्यांचा एकूण डीए मूळ पगाराच्या 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात देखील वाढ करण्यात आली आहे. तर सहाव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या मे महिन्याच्या पगारासह वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे.