Vande Bharat Train : मुंबई-पुणे प्रवास आता 150 मिनिटांत, सुरू होणार वंदे भारत ट्रेन

Semi-high-speed train : महाराष्ट्राच्या (Maharashtra Railway Travel) रेल्वे प्रवासाला चालना मिळणार आहे. कारण राज्याला पहिली वंदे भारत ट्रेन Vande Bharat Train)मिळणार आहे. मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) हा त्यातील एक रेल्वे मार्ग असणार आहे. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन (semi-high-speed train) भारतीय रेल्वे व्यवस्थेतील सर्वात वेगवान ट्रेन आहे. वंदे भारत गाड्या मार्गांदरम्यान लागू झाल्यानंतर, दोन्ही शहरांमधील प्रवास फक्त150 मिनिटांत किंवा अडीच तासांत पूर्ण करता येणार आहे.

Vande Bharat Train between Mumbai & Pune
मुंबई आणि पुणे दरम्यान सुरू होणार वंदे भारत ट्रेन 
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वे लवकरच महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन सुरू करणार
  • मुंबई आणि पुणे दरम्यान धावणार वंदे भारत ट्रेन, 150 मिनिटांत प्रवास पूर्ण
  • दोन नवीन गाड्या 15 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता

Indian Railways Update: मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra Railway Travel) रेल्वे प्रवासाला चालना मिळणार आहे. कारण राज्याला पहिली वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train)मिळणार आहे. मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) हा त्यातील एक रेल्वे मार्ग असणार आहे. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन (semi-high-speed train) भारतीय रेल्वे व्यवस्थेतील सर्वात वेगवान ट्रेन आहे. वंदे भारत गाड्या मार्गांदरम्यान लागू झाल्यानंतर, दोन्ही शहरांमधील प्रवास फक्त150 मिनिटांत किंवा अडीच तासांत पूर्ण करता येणार आहे. रेल्वेने अद्याप तारीख निश्चित केली नसली तरी, दोन नवीन गाड्या 15 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. (Railways to start Vande Bharat Train between Mumbai & Pune)

अधिक वाचा : EPF interest rate update: लाखो कर्मचाऱ्यांना धक्का! प्रॉव्हिडंट फंडावरील व्याजदरात झाली कपात; मिळणार फक्त 8.1 टक्के व्याज

सध्या डेक्कन क्विन सर्वात वेगवान

मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील रेल्वे प्रवासासाठी तीन तास दहा मिनिटे लागणारी डेक्कन क्वीन ही सध्या दोन शहरांमधील सर्वात वेगवान ट्रेन आहे.  मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही दोन शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण ट्रेनमध्ये चेअर कार्स आहेत आणि त्या मार्गावर सुरळीतपणे चालवता येतात."

वंदे भारत गाड्यांमध्ये आता बसण्याची व्यवस्था म्हणून फक्त चेअर कार आहेत, त्यामुळे मुंबई-पुणे हा मार्ग निवडण्यात आला.

अधिक वाचा : Indian Railway: रेल्वेने एका क्षणात बदलली 114 वर्षे जुनी प्रशासकीय यंत्रणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वंदे भारत ट्रेनचा दुसरा टप्पा

2023 मध्ये, रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत ट्रेनच्या फेज 2 मध्ये AC स्लीपर्स बसवण्याची योजना आखली आहे. या ट्रेन मुंबईच्या CSMT आणि पंजाबच्या फिरोजपूर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकादरम्यान धावतील. “मुंबई आणि पंजाब दरम्यान एसी स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा आमचा मानस आहे. दोन राज्यांमधील प्रवासाचा वेळ सध्या सुमारे 33 तासांचा आहे, परंतु तो बराच कमी होईल, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा : 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलैपासून वाढ; हातात येणार इतके पैसे

मे महिन्यात विभागीय रेल्वेला लिहिलेल्या पत्रात, रेल्वे मंत्रालयाने माझगाव आणि जोगेश्वरी येथील वाडीबंदर रेल्वे यार्डचा वापर देखभाल डेपो बांधण्यासाठी केला जाईल, असे जाहीर केले. मध्य आणि पश्चिम रेल्वेला स्थानांचे निरीक्षण करण्याचे आणि वंदे भारत ट्रेनच्या देखभालीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि अपग्रेडचे नियोजन करण्याचे काम देण्यात आले होते. वाहतूक तज्ज्ञांच्या मते या नवीन गाड्या मुंबई-पुणे दरम्यान गेम चेंजर ठरतील. परंतु घाट क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जावे लागेल.

रेल्वेतील प्रशासकीय बदल

भारतीय रेल्वे सध्या  संक्रमणाच्या काळातून जाते आहे. रेल्वेमध्ये सतत नवनवे बदल होत आहेत. ट्रेनमध्ये काळानुरूप आधुनिकीकरण करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी वाढवण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. या क्रमवारीत आता एक मोठा बदल करण्यात आला आहे की भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) 114 वर्षे जुन्या प्रशासकीय रचनेत बदल करण्यात आला आहे. एक सेवा भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS) तयार करण्यासाठी आठ केडरचे विलीनीकरण करण्यात आले. म्हणजेच रेल्वे अधिकाऱ्यांना व्यवस्थापन सेवेचे अधिकारी म्हटले जाईल. विविध कॅडरमध्ये सात दशकांपासून सुरू असलेली लॉबिंग क्षणार्धात संपुष्टात आल्याचा दावा यामुळे केला जातो आहे. रेल्वे आता आधुनिकतेच्या मार्गावर धावणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी