Rakesh Jhunjhunwala Stock Portfolio : मुंबई : आपल्या गुंतवणूक कौशल्याने भारताचे वॉरेन बफे (Warren Buffett)अशी ख्याती मिळवणारे सुप्रसिद्ध गुंतवणुकदार म्हणजे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala). त्यांच्या कृतींकडे, त्यांच्या पोर्टफोलिओकडे सर्वांचेच लक्ष असते. शेअर बाजाराबद्दल (Share Market), अर्थव्यवस्थेबद्दल किंवा एखाद्या कंपनीबद्दल राकेश झुनझुनवाला काय म्हणतात किंवा त्यांनी काय म्हटले याकडे सर्व काळजीपूर्वक पाहत असतात. राकेश झुनझुनवाला यांनी एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले किंवा त्यातील हिस्सा वाढवला (Rakesh Jhunjhunwala Portfolio) तर गुंतवणुकदारांचे लक्ष ताबडतोब त्या शेअर्सकडे जाते. कारण झुनझुनवाला यांचे शेअर्समध्ये कमाईची जोरदार संधी असे समीकरण निर्माण झाले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहोत ज्याच्या शेअर्सची दणकून खरेदी झुनझुनवालांनी केली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी अलीकडेच नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी (Nagarjuna Construction Company)या हैदराबादस्थित बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनीचे अतिरिक्त 44 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. (Rakesh Jhunjhunwala bought 44 lakh shares of this company, do you know it)
अधिक वाचा : Property Tips | घर खरेदी करतांय? मग खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, होणार नाही फसवणूक
राकेश झुनझुनवाला यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणुकदारांचा या कंपनीत रस वाढला आहे. राकेश झुनझुनवाला यांनी मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे एनसीसी (Nagarjuna Construction Company) (NCC) या हैदराबादस्थित बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनीचे अतिरिक्त 44 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे चौथ्या तिमाहीच्या शेवटी कंपनीमध्ये 13.56 टक्के हिस्सा किंवा 8.27 कोटी शेअर्स होते.
झुनझुनवाला यांच्याकडे 6.67 कोटी शेअर्स किंवा 10.94% शेअर्स होते, तर त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे गेल्या तिमाहीच्या शेवटी 2.62% शेअर्स किंवा 1.60 कोटी शेअर्स होते. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत, या जोडप्याकडे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीचे 12.8% स्टेक किंवा 7.8 कोटी इक्विटी शेअर्स होते. झुनझुनवाला यांचे शेअरहोल्डिंग 6.67 कोटींवर स्थिर राहिले. तर त्यांची पत्नी रेखाची हिस्सेदारी डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस 1.16 कोटी शेअर्सवर होती. गेल्या तिमाहीत या जोडप्याने अतिरिक्त 44 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.
मार्च तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांची होल्डिंग्स 19.68% वर स्थिर राहिली. परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी डिसेंबर तिमाहीत त्यांची होल्डिंग 11.62% वरून कमी केली आहे. तीच मार्च तिमाहीत 8.89% इतकी होती. मात्र या तिमाहीत परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांची संख्या 133 वरून 138 वर पोचली आहे. म्युच्युअल फंडांनीही कंपनीतील त्यांची होल्डिंग मार्च तिमाहीत 12.23% वरून वाढवली आहे. डिसेंबर तिमाहीत ती 12.12% होती.
NCC चा शेअर 13 एप्रिल रोजी 0.71% घसरून रु. 70.10 वर बंद झाला. शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या हलत्या सरासरीपेक्षा जास्त आहे. परंतु 200 दिवसांच्या हलत्या सरासरीपेक्षा कमी आहे. एका वर्षात या शेअरची किंमत 8.18% कमी झाली आहे. 2022 मध्ये हा शेअर 1% घसरला आहे. मात्र हा शेअर एका महिन्यात 12% आणि आठवड्यात 0.72% वाढला आहे. 13 एप्रिल रोजी कंपनीचे मार्केट कॅप BSE वर 4244.53 कोटी रुपये होते. हा शेअर 12 जुलै 2021 रोजी 98.45 रुपये या 52 आठवड्यांचा उच्चांक आणि 24 फेब्रुवारी 2022 रोजी 55.80 रुपये असा 52 आठवड्यांचा नीचांकीवर पोचला.
अधिक वाचा : Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी
NCC ने 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिसर्या तिमाहीत 76.42 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 71.20 कोटी रुपये होता. सरलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्री 41.75% वाढून 3014.94 कोटी रुपये झाली. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीची विक्री 2126.90 कोटी रुपये होती. इतर उत्पन्न वगळून कंपनीचा ऑपरेटिंग नफा डिसेंबर तिमाहीत 7.90% वाढून 357.24 कोटी रुपये झाला आहे. तर 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत म्हणजे डिसेंबरअखेर कंपनीचा ऑपरेटिंग नफा 276.38 कोटी रुपये होता.
NCC लिमिटेड ही कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रातील बांधकाम/प्रकल्प या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतलेली आहे. प्रामुख्याने औद्योगिक आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम, गृहनिर्माण प्रकल्प, रस्ते, पूल आणि उड्डाणपूल, पाणीपुरवठा आणि पर्यावरण प्रकल्प, खाणकाम, वीज पारेषण लाईन, सिंचन, आणि हायड्रोथर्मल पॉवर प्रकल्प, रिअल इस्टेट विकास या क्षेत्रात कंपनी काम करते.