Rakesh Jhunjhunwala New House : राकेश झुनझुनवालांचा नवा १४ मजली महाल, मुंबईतील सर्वात पॉश भागात

Rakesh Jhunjhunwala: अब्जाधीश राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)आता १४ मजली आलिशान घरात राहणार आहेत. राकेश झुनझुनवालांचे हे नवे घर मुंबईतील सर्वात महागड्या आणि पॉश भागात म्हणजे मलबार हिलमध्ये असणार आहे. मलबार हिल येथे झुनझुनवालांच्या या नव्या महालासारख्या घराचे काम (Rakesh Jhunjhunwala New House)सुरू आहे. या भागात अनेक उद्योगपती आणि बड्या हस्तींची घरे आहेत.

Rakesh Jhunjhunwala new home
राकेश झुनझुनवाला यांचे नवे घर 
थोडं पण कामाचं
  • देशातील सर्वात मोठ्या गुंतवणुकदाराचे नवे आलिशान घर
  • झुनझुनवालांचा १४ मजली नवा निवास
  • मुंबईतील मलबार हिल येथे ३७१ कोटींना विकत घेतली नवी जागा

Rakesh Jhunjhunwala New House | नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध गुंतवणुकदार आणि अब्जाधीश राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)आता १४ मजली आलिशान घरात राहणार आहेत. राकेश झुनझुनवालांचे हे नवे घर मुंबईतील सर्वात महागड्या आणि पॉश भागात म्हणजे मलबार हिलमध्ये असणार आहे. मलबार हिल येथे झुनझुनवालांच्या या नव्या महालासारख्या घराचे काम (Rakesh Jhunjhunwala New House)सुरू आहे. या भागात अनेक उद्योगपती आणि बड्या हस्तींची घरे आहेत. नव्या घराच्या बांधकामासाठी झुनझुनवाला यांनी ३७१ कोटी रुपयांमध्ये जमीन विकत घेतली होती. (Rakesh Jhunjhunwala's new luxurious 14 floor house is being bulit in Mumbai)

राकेश झुनझुनवाला ५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीनिशी देशातील ३६व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. झुनझुनवाला सध्या आपल्या कुटुंबासह एका अपार्टमेंटमध्ये दोन मजली घरात राहतात. मलबार हिलमध्येच सज्जन जिंदल, आदि गोदरेज, बिर्ला कुटुंबियदेखील राहतात. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर आहे. इथे एका चौ. फूट जागेची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. झुनझुनवाला यांच्या नव्या घराचे बांधकाम बीजी खेर मार्गावर सुरू असून ते १४ मजली असणार आहे. 

३७१ कोटींना विकत घेतली जागा

ज्या जागी देशातील या सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या आलिशान घराचे काम सुरू आहे तिथे आधी १४ फ्लॅट्स होते. झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ही जागा ३७१ कोटी रुपयांना विकत घेतली होती. इथे असणारे फ्लॅट्स पाडून आता तिथे नवा बंगला बांधला जातो आहे. एकूण २७०० चौ. फूटांच्या प्लॉटवर ५७ मीटर उंच इमारत बांधली जाते आहे. झुनझुनवाला यांच्या नव्या घरात एका फ्लोअरवर बेंक्वेट हॉल, एका मजल्यावर स्विमिंग पूल, एका मजल्यावर जिम, एका मजल्यावर होम थिएटर यासारख्या व्यवस्था असतील. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ७०.२४ चौ.मीटरमध्ये कंझर्व्हेटरी एरिया, री-हीटिंग किचन, पिझ्झा काउंटर, आउटडोअर सीटिंगसाठीची जागा, व्हेजिटेबल गार्डन, बाथरुम आणि एक खुले टेरेस असणार आहे.

असा असणार शेअर बाजाराच्या या बादशाहाचा महाल

समोर आलेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांच्या नव्या घराचा जो बिल्डिंग प्लॅन नगररचना विभागाला देण्यात आला आहे त्यात १२व्या मजल्याला मास्टर्स फ्लोअरचे नाव देण्यात आले आहे. इथे राकेश झुनझुनवाला आपली पत्नी रेखा यांच्यासह राहणार आहेत. या मजल्यावर एक मोठा बेडरुम, वेगवेगळे बाथरुम, ड्रेसिंग रुम आणि एक इंग्रजी एल अक्षराच्या आकाराचे लिव्हिंग रुम असणार आहे. इथे बाल्कनी, पॅन्ट्री, सलून इत्यादीशिवाय स्टाफसाठीच्या रुम असणार आहेत. ११ व्या मजल्यावरील जागा तीन मुलांसाठी असणार आहे. दोन्ही मुलांसाठी दोन बेडरुम असणार आहेत. या दोन मोठ्या बेडरुमसह मोठी टेरेसदेखील असणार आहे. तर मुलीचे बेडरुमदेखील याच मजल्यावर दुसऱ्या बाजूला असणार आहे. या मजल्यावर ड्रेसिंग रुम, स्टडी आणि बाथरुमदेखील असणार आहेत.

आणखी काय असणार नव्या घरात

नवव्या मजल्यावर तीन केबिन, दोन बाथरुम, स्टाफ एरिया यांच्यासह एक पॅन्ट्री असणार आहे. हे एकप्रकारे झुनझुनवाला यांचे ऑफिस असणार आहे. ८व्या मजल्यावर जिम बनवण्यात येते आहे. यामध्ये दोन मसाज रुम, एक स्टीम रुम आणि एक बाथरुम असणार आहे. तर ७व्या मजल्यावर एक इनफिनिटी पूल असणार आहे. या पूलवरून मोकळे आकाश दिसणार आहे. सहाव्या मजल्यावर सर्व्हिस फ्लोअर असणार आहे. पाचव्या मजल्यावर होम थिएटर, लाउंज, बाथरुम आणि इक्विपमेंट रुम असणार आहे. खालच्या मजल्यार बॅंक्वेट हॉल बनतो आहे.

चौथ्या मजल्यावर पाहुण्यांच्या स्वागताची व्यवस्था असणार आहे. इथे एक एल आकाराचे किचन बनवण्यात येते आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मध्यम आकाराचे काही रुम, बाथरुम आणि स्टोरेज एरिया असणार आहे. तळमजल्यावर तीन पट उंच असणारी लॉबी, एक फॉये आणि एक फुटबॉल कोर्ट बनवले जाणार आहे. बेसमेंटला सर्व्हिसेस आणि पार्किंगसाठी वापरले जाणार आहे. इथे सात पार्किंग स्लॉट बनणार आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी