Rakesh Jhunjunwala होते गुंतवणूकदारांचे प्रेरणास्थान; जाणून घ्या त्यांच्याविषयीच्या माहिती नसलेल्या खास गोष्टी

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Aug 14, 2022 | 11:33 IST

Rakesh Jhunjunwala Passed away: गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. ते खऱ्या अर्थाने गुंतवणूकदारांचे प्रेरणास्थान होते. जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी.

rakesh jhunjunwala was called indias warren buffet inspiration for investors know big things related to business
Rakesh Jhunjunwala यांच्याविषयी माहिती नसलेल्या खास गोष्टी 
थोडं पण कामाचं
  • झुनझुनवाला हे अकासा एअरचे (Akasa Air) संस्थापक होते.
  • गुंतवणूकदार शेअर बाजाराशी संबंधित अनेक गोष्टी झुनझुनवाला यांच्याकडून जाणून घ्यायचे.
  • झुनझुनवाला यांनी तीन बॉलिवूड चित्रपटांची निर्मितीही केली होती.

Rakesh Jhunjunwala Passed away: मुंबई: सुप्रसिद्ध उद्योगपती आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjunwala) यांचे आज रविवारी (१४ ऑगस्ट २०२२) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. आमच्या सहयोगी बिझनेस चॅनलच्या माहितीनुसार, झुनझुनवाला विविध आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. (rakesh jhunjunwala was called indias warren buffet inspiration for investors know big things related to business)

व्यावसायिक जगतात त्यांच्या वेगळ्या प्रवेशामुळे त्यांना "वॉरेन बफे ऑफ इंडिया", "किंग ऑफ डिव्हिडंड" आणि "द बुल ऑफ दलाल स्ट्रीट" असे संबोधलं जायचं. ते एक ट्रेडर तर होतेच पण त्यासोबतच ते सीए (चार्टर्ड अकाउंटंट) देखील होते.

अधिक वाचा: Rakesh Jhunjhunwala: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बिनधास्त स्वभाव, जोखीम घेण्यात मागे हटायचे नाही

देशातील प्रसिद्ध लोक आणि श्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणना होते. हंगामा मीडिया आणि अॅपटेकचे ते अध्यक्षही होते. तसेच Viroy Hotels, Concorde Biotech, Provogue India आणि Geojit Financial Services चे संचालक होते. झुनझुनवाला यांचा स्वभाव हा बिनधास्त होता. त्यांच्या जुन्या मुलाखतींचा एक खास भाग पाहा:

झुनझुनवालाच्या कुटुंबात कोण-कोण?

5 जुलै 1960 रोजी जन्मलेल्या झुनझुनवाला यांनी शेअर व्यवसायात गुंतवणूक करून सुमारे 46 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा, मुलगी निष्ठा, मुले आर्यमन आणि आर्यवीर असा परिवार आहे. टायटन, स्टार हेल्थ, मेट्रो ब्रँड, टाटा मोटर्स आणि क्रिसिलमध्ये त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक होती.

अधिक वाचा: Akasa च्या विमानाने केले टेक ऑफ, मालक कोण, कुठून सुरू झाली सेवा, जाणून घ्या सर्व काही

कॉलेजला असल्यापासूनच करायचे ट्रे़डिंग

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले झुनझुनवाला हे आर्थिक पार्श्वभूमीचे होते आणि त्यांचा बराच काळ शेअर बाजाराकडे कल होता. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ट्रेडिंग सुरू केलं होतं. ही गोष्ट 1985 च्या आसपासची आहे. जेव्हा त्यांनी 5000 रुपये गुंतवले होते. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर 2022 पर्यंत त्यांनी तब्बल 4.9 अब्ज अमेरिकन डॉलरची (फोर्ब्स मासिकानुसार) कमाई केली होती.

अधिक वाचा: Radhakishan Damani : डी-मार्टचे मालक राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजाराच्या घसरणीत 3 महिन्यांत गमावले 26,000 कोटी

जेव्हा वडिलांनी दिला होता पैसे देण्यास नकार 

झुनझुनवाला हे नेहमीच आपल्या मित्रांसोबत शेअर मार्केटबद्दल बोलत असे. त्यावेळी ते सांगायचे की, त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांना ट्रेडिंगसाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता. जोखीम पत्करून त्यांनी त्याच्या भावाच्या ग्राहकांकडून पैसे घेतले होते आणि वचन दिले की तो त्यांना जास्त परतावा देऊन मूळ रक्कम परत करेल. 1986 मध्ये त्यांनी टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले होते. तेव्हा त्यांना मोठा फायदा झाला होता. त्यावेळी त्यांना तीन महिन्यांत तिप्पट नफा (रु. 143) झाला होता.

बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती

इंग्लिश विंग्लिश, शमिताभ आणि की अँड का या तीन बॉलिवूड चित्रपटांची निर्मितीही झुनझुनवाला यांनी केली होती. त्यांनी 1999 मध्ये चार भागीदारांसह हंगामा डिजिटल मीडिया सुरू केला, जो नंतर हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड बनला.

खवय्ये होते, हे पदार्थ आवडायचे खूप

राकेश झुनझुनवाला हे खवय्ये होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांना स्ट्रीट फूड, डोसा आणि चायनीज पदार्थ खूप आवडायचे. ते मनाने पक्के मुंबईकर होते आणि पावभाजी खूप आवडीने खात असे. मोकळ्या वेळेत तो खाण्यापिण्याशी संबंधित कार्यक्रम पाहत असे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी