Rana Kapoor Statement | प्रियंका गांधींकडून 2 कोटींचे पेंटिंग खरेदी करण्यास मला भाग पाडले: येस बँकेचे राणा कपूर यांचा धक्कादायक खुलासा

Rana Kapoor on Gandhi Family : येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर (Yes Bank co-founder Rana Kapoor) यांनी सक्तवसूली संचालनालयासमोर (ईडी) एक धक्कादायक खुलासा केला आहे. राणा कपूर यांनी ईडीला सांगितले आहे की, काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra)यांच्याकडून एमएफ हुसेन पेंटिंग (M F Husain painting)विकत घेण्यासाठी मला "बळजबरी" करण्यात आली होती आणि विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्क येथे वापरली होती.

Rana Kapoor allegations against Gandhi family
राणा कपूर यांचे गांधी कुटुंबियांवरील आरोप 
थोडं पण कामाचं
  • राणा कपूर यांचा ईडीसमोर गांधी कुटुंबियांविरोधात धक्कादायक खुलासा
  • प्रियांका गांधीकडून एम एफ हुसेन यांचे 2 कोटी रुपयांचे पेंटिंग जबरदस्तीने खरेदी करण्यास लावल्याचा केला आरोप
  • ही रक्कम गांधी कुटुंबाने सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी न्यूयॉर्क येथे वापरल्याची राणा कपूरने दिली माहिती

Rana Kapoor to Enforcement Directorate : नवी दिल्ली : येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर (Yes Bank co-founder Rana Kapoor) यांनी सक्तवसूली संचालनालयासमोर (ईडी) एक धक्कादायक खुलासा केला आहे. राणा कपूर यांनी ईडीला सांगितले आहे की, काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra)यांच्याकडून एमएफ हुसेन पेंटिंग (M F Husain painting)विकत घेण्यासाठी मला "बळजबरी" करण्यात आली होती आणि विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्क येथे वापरली होती. फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार ही माहिती देण्यात आली आहे. ((Rana Kapoor says he was forced to buy Rs 2 crore painting from Priyanka Gandhi)

राणा कपूर यांचा ईडीसमोर खुलासा

राणा कपूर यांनी ईडीला असेही सांगितले की त्यांना तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले होते की एम एफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांना गांधी कुटुंबाशी नाते निर्माण करण्यात अडचण येईल  शिवाय त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार देखील मिळणार नाही. राणा कपूरचे स्टेटमेंट हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ेथील विशेष न्यायालयात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या येस बँकेचे सहसंस्थापक, त्यांचे कुटुंब, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान आणि इतरांविरुद्धच्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्राचा भाग आहेत. 

अधिक वाचा : Fraud Alert | स्टेट बॅंकेचा ग्राहकांना सावधगिरीचा इशारा, या नंबरपासून दूर राहा, पाहा काय आहे कारण....

सोनिया गांधीच्या उपचारासाठी वापरली रक्कम

2 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे सांगून कपूर यांनी दावा केला की "मिलिंद देवरा (दिवंगत मुरली देवरा यांचा मुलगा आणि काँग्रेसचे माजी खासदार) यांनी नंतर त्यांना गोपनीयपणे सांगितले की विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबियांनी सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये वापरली.  कपूर यांनी ईडीला असेही सांगितले की, सोनिया गांधींचे जवळचे विश्वासू अहमद पटेल यांनी त्यांना सांगितले होते की, सोनिया गांधींच्या वैद्यकीय उपचारासाठी योग्य वेळी गांधी कुटुंबाला मदत देऊन मी (कपूर) कुटुंबासाठी चांगले काम केले आहे आणि त्यांचा 'पद्मभूषण' पुरस्कारासाठी योग्य विचार केला जाईल.

ईडीच्या आरोपपत्रानुसार मुरली देवरा यांनी राणा कपूरला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांना गांधी कुटुंबाशी कधीही संबंध निर्माण करता येणार नाही. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळण्यापासूनही रोखले जाईल. दिवंगत देवरा यांनी रात्रीच्या जेवणात कपूर यांना सांगितले होते की त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली नाही तर त्याचे त्यांच्यावर आणि येस बँकेवर "विपरित परिणाम" होऊ शकतात असा कपूर यांनी ईडीला दिलेल्या माहितीत दावा केला आहे. मार्च 2020 मध्ये या प्रकरणात अटक झाल्यापासून येस बॅंकेचे हे सहसंस्थापक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! डीए दरवाढीला लागू शकतो ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण कारण

पेंटिंग न घेतल्यास परिणामांची धमकी

"सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ही सक्तीची विक्री होती ज्यासाठी मी कधीही तयार नव्हतो", आरोपपत्रात कपूर यांनी कथितपणे प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडून खरेदी केलेल्या पेंटिंगबद्दल म्हटले आहे. मिलिंद देवरा यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडून एमएफ हुसेन पेंटिंग खरेदी करण्यासाठी त्यांचे (राणा कपूर) घर आणि कार्यालयात अनेक वेळा भेटी दिल्या होत्या.  "त्याने या संदर्भात मला अनेक मोबाईल नंबरवरून अनेक कॉल आणि मेसेज देखील केले होते. खरं तर, मी या डीलसाठी फारच नाखूष होतो आणि मी त्याच्या कॉल्स/मेसेजकडे दुर्लक्ष करून हा व्यवहार टाळण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. ”असे आरोपपत्रानुसार कपूर यांनी ईडीला सांगितले आहे.

कपूर यांनी ईडीला पुढे सांगितले आहे की, नंतर, 2010 मध्ये, मुरली देवराने त्यांना नवी दिल्लीतील लोधी इस्टेट बंगल्यावर शाकाहारी जेवणासाठी (मारवाडी डिनर) भेटण्यास भाग पाडले. त्यावेळी ते पेट्रोलियम मंत्री होते आणि त्यामुळे त्यांना हा बंगला मिळाला होता. कपूर यांनी सांगितले आहे की, "मीटिंग दरम्यान, दिवंगत मुरली देवरा यांनी मला सांगितले होते की ही पेंटिंग खरेदी करण्यात आणखी विलंब झाल्यास माझ्यावर आणि माझ्या येस बँकेवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे देवरा कुटुंबाशी असलेले माझे नाते धोक्यात येऊ शकते." "त्याचबरोबर, त्यांनी मला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की ते मला कधीही गांधी कुटुंबाशी नाते निर्माण करण्यास परवानगी देणार नाही," राणा कपूर पुढे म्हणाले.

अधिक वाचा :  Edible oil price | महत्त्वाची बातमी! देशातील खाद्यतेल महागणार...इंडोनेशियाची 28 एप्रिलपासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी, भारतीय बाजारपेठेत खळबळ

मिलिंद देवरांनी घडवून आणला व्यवहार

"मिलिंद देवरा यांनी या अंतिम समारोपाच्या बैठकीचे सक्रियपणे समन्वय साधले होते. मी हे सांगू इच्छितो की या व्यवहारासाठी मी HSBC बँकेतील माझ्या वैयक्तिक खात्याच्या धनादेशाद्वारे 2 कोटी रुपये दिले आहेत," असे ते पुढे म्हणाले.  कपूर म्हणाले की या करारानंतर काही आठवड्यांनंतर, मिलिंद देवरा यांनी त्यांना गोपनीयपणे सांगितले की विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबाने सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील वैद्यकीय उपचारांसाठी वापरली होती.

“काही महिन्यांनंतर, मी सोनिया गांधींचे जवळचे विश्वासू (दिवंगत) अहमद पटेल यांच्या निवासस्थानी जात असताना, मला त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळवण्यात आले की, सोनिया यांच्या वैद्यकीय उपचारासाठी योग्य वेळी गांधी कुटुंबाला पाठिंबा देऊन मी गांधी कुटुंबासाठी एक चांगले काम केले होते आणि माझा 'पद्मभूषण'साठी योग्य विचार केला जाईल," असे आरोपपत्रात म्हटले आहे.

मनी लॉंडरिंग प्रकरण

राणा कपूर आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवन यांनी संशयास्पद व्यवहारांद्वारे 5,050 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ED)केला आहे. 3 मार्च 2020 रोजी ईसीआयआर नोंदवल्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता आणि चौकशी सुरू झाल्यानंतर, राणा कपूरने पीएमएलए अंतर्गत ईडीद्वारे संलग्न होण्यापासून वाचवण्यासाठी आक्रमकपणे त्याच्या परदेशातील मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी