Ration Card Update:नवी दिल्ली : शिधापत्रिका लाभार्थी म्हणजे रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या निर्णयाचा रेशन कार्डधारकांना (Ration Card Holder) मोठा फटका बसू शकतो. खरे तर, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत, उत्तर प्रदेशमध्ये 19-30 जूनपर्यंत मोफत रेशनचे वाटप केले जाईल. मात्र, यावेळी लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ५ किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच, यावेळी नागरिकांना मोफत रेशन (Free Ration)अंतर्गत गव्हापासून वंचित राहावे लागेल. या संदर्भात अन्न व रसद विभागाच्या आयुक्तांनी आदेशही जारी केले आहेत. (Ration card holders will not get free wheat, government issues order)
वास्तविक, आतापर्यंत मोफत रेशन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिले जात होते. मात्र अन्न व रसद विभागाच्या आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार यावेळी लाभार्थ्यांना गव्हाऐवजी केवळ पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशसोबतच अनेक राज्यांमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अधिक वाचा : Father’s Day Gift : या फादर्स डे निमित्त वडिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी द्या आर्थिक भेट, पाहा कशी?
विशेष म्हणजे गव्हाच्या कमी खरेदीमुळे सरकारने रेशन कोट्यातील गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या माहितीसाठी ही दुरुस्ती फक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) साठी करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या जागी सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदळाचे अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे.
तुम्हालाही या सरकारी योजनेचा लाभ मिळाला, तर तुम्ही पोर्टेबिलिटी चलनाद्वारे तांदूळ घेऊ शकाल. याशिवाय, तुम्हाला माहित असायला हवे की, 30 जून रोजी, आधार प्रमाणीकरणाद्वारे अन्नधान्य घेण्यास सक्षम नसलेल्या पात्र व्यक्तींना मोबाईल ओटीपी पडताळणीद्वारे तांदूळ वितरित केले जातील. वितरणाच्या वेळी पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले नोडल अधिकारी सर्व दुकानांवर उपस्थित राहतील.
तुम्हीही शिधापत्रिकाधारक (Ration Card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल (New Ration Card Rule) करण्यात येत आहेत. या अंतर्गत, सरकारी रेशन दुकानातून रेशन घेणार्या पात्र लोकांसाठी निश्चित केलेले मानक म्हणजे निकष बदलणार आहेत. तुमच्या माहितीसाठी नवीन मानकाचा मसुदा आता जवळजवळ तयार आहे. त्यासाठी राज्य सरकारांशी बैठकांची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. रेशन कार्डासंबंधित नवीन मानके देखील तयार करण्यात येणार आहेत. यासाठी विविध राज्य सरकारांनी दिलेल्या सूचनादेखील लक्षात घेतल्या जात आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशात असे अनेक लोक आहेत जे बनावट मार्गाने रेशनचा फायदा घेत आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, सध्या देशभरात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (NFSA) लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. यामुळेच आता सरकार आपल्या नियमात बदल करणार आहे. नवीन मानक पूर्णत: पारदर्शक केले जाणार आहे, जेणेकरून त्यात कोणताही गैरप्रकार होणार नाही.