Free Ration Scheme: शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल, तर आता सरकार तुमच्यासाठी आणखी एक खास योजना बनवत आहे, ज्याअंतर्गत मोफत गहू, तांदूळ याशिवाय इतर वस्तूही अगदी कमी किमतीत मिळू शकतात.
अधिक वाचा : Same Sex Marriage: समलिंगी विवाहांसाठी केंद्राचा नकार; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
अन्नमंत्र्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातात. उत्तराखंड सरकार कमी किमतीत साखर आणि मीठ याशिवाय 23 लाख कुटुंबांना मोफत रेशन देण्याची योजना आखत आहे. उत्तराखंडच्या अन्नमंत्र्यांनी सांगितले की, विभागाने या योजनेसाठी बजेट प्रस्तावही तयार केला आहे. ते मंत्रिमंडळात मांडले जाईल. ही योजना लागू केल्यानंतर राज्याला सुमारे ६५ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे.
अधिक वाचा : Virat Kohli Century: किंग कोहलीचा 'विराट' अवतार, टेस्ट क्रिकेटमधला संपला शतकांचा दुष्काळ
माध्यमांना माहिती देताना अन्न मंत्र्यांनी सांगितले की, 2023 मध्ये केंद्र सरकारने देशभरातील कुटुंबांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण वर्षात लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे. गहू आणि तांदूळ तसेच साखर आणि मीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तू प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध व्हाव्यात, असे राज्य सरकारने म्हटले आहे.