Ration Card Update: रेशन घेण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या रेशन कार्डशी संबंधित नवीन तरतुदी

Ration Card Standards : तुम्हीही शिधापत्रिकाधारक (Ration Card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल (New Ration Card Rule) करण्यात येत आहेत. या अंतर्गत, सरकारी रेशन दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेले मानक म्हणजे निकष बदलणार आहेत. तुमच्या माहितीसाठी नवीन मानकाचा मसुदा आता जवळजवळ तयार आहे. त्यासाठी राज्य सरकारांशी बैठकांची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

New Ration Card Rules
रेशन कार्डशी निगडीत नवे नियम 
थोडं पण कामाचं
  • अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल
  • रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेले निकष बदलणार
  • विविध राज्य सरकारांनी दिलेल्या सूचनादेखील लक्षात घेतल्या जाणार

Standards for Ration Card:नवी दिल्ली : तुम्हीही शिधापत्रिकाधारक (Ration Card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल (New Ration Card Rule) करण्यात येत आहेत. या अंतर्गत, सरकारी रेशन दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेले मानक म्हणजे निकष बदलणार आहेत. तुमच्या माहितीसाठी नवीन मानकाचा मसुदा आता जवळजवळ तयार आहे. त्यासाठी राज्य सरकारांशी बैठकांची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. रेशन कार्डासंबंधित नवीन मानके देखील तयार करण्यात येणार आहेत. यासाठी विविध राज्य सरकारांनी दिलेल्या सूचनादेखील लक्षात घेतल्या जात आहेत. रेशन कार्डाशी निगडीत नवीन तरतुदीबद्दल जाणून घेऊया. (Ration card rules changed, know the new provisions for rationing)

अधिक वाचा : EPFO Update: मोठी बातमी! या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या कसे तपासायचे

मानके का बदलत आहेत?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशात असे अनेक लोक आहेत जे बनावट मार्गाने रेशनचा फायदा घेत आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, सध्या देशभरात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (NFSA) लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. यामुळेच आता सरकार आपल्या नियमात बदल करणार आहे. नवीन मानक पूर्णत: पारदर्शक केले जाणार आहे, जेणेकरून त्यात कोणताही गैरप्रकार होणार नाही.

राज्य सरकारांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन नवीन मानके तयार केली जात आहेत जी लवकरच अंतिम केली जातील.

अधिक वाचा : IRCTC Destination Alert Service : आता प्रवाशांना स्टेशन सुटण्याची चिंता न करता झोपता येणार, रेल्वेने सुरू केली वेकअप अलर्ट सुविधा...

वन नेशन, वन रेशन कार्ड योजना

विशेष म्हणजे, आतापर्यंत ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (ONORC) योजना लागू करण्यात आली आहे. करोडो लाभार्थी म्हणजेच NFSA अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत. लोकांना मदत करण्यासाठी सरकारने मोफत रेशन योजनेतही वाढ केली आहे.

सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचा लाभ लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसांत सरकारच्या निदर्शनास आले. यामुळे सरकारने पात्र रेशनकार्ड धारकांची छाननी करण्याचे ठरविले आहे. जे अपात्र आहेत अशा लोकांनी स्वतःच त्यांचे रेशनकार्ड रद्द करून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून जनतेला करण्यात येत आहे. शिधापत्रिका रद्द न झाल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल. अशा लोकांवरही कारवाई होऊ शकते.

अधिक वाचा : PM Kisan Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानसाठीची eKYC साठी मुदत सरकारने वाढवली, ही आहे नवीन अंतिम मुदत

आधारशी लिंक करा रेशन कार्ड

शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड छाननीनंतर रद्द केले जाणार आहेत. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केले जाणार आहे. 

त्याचबरोबर रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बाब आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारच्या वतीने 'वन नेशन वन रेशन कार्ड'वर (One Nation One Ration Card) काम सुरू आहे. याअंतर्गत तुम्हाला कोणत्याही राज्यातील कोणत्याही दुकानातून रेशन मिळू शकेल. यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड आणि आधार (Aadhaar Card) लिंक करावे लागेल. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक (Ration Card-Aadhaar Link) केले नसेल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी