केवायसीसाठी आता बॅंकेत फेऱ्या मारण्याची गरज नाही, आरबीआयने शोधला उपाय

काम-धंदा
Updated Jan 10, 2020 | 16:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

रिझर्व्ह बॅंकेने एनबीएफसी, वॉलेट सेवा पुरवठा तसेच इतर वित्तीय संस्थांना केवायसी संबंधित काहीसा दिलासा दिला आहे. आरबीआयने व्हिडिओच्या आधारे केवायसी अपडेट करण्याला मंजुरी दिली आहे.

RBI allows video KYC for finance firms
केवायसीसाठी आता बॅंकेत फेऱ्या मारण्याची गरज नाही, आरबीआयने शोधला उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रिझर्व्ह बॅंकेने एनबीएफसी, वॉलेट सेवा पुरवठा तसेच इतर वित्तीय संस्थांना केवायसी संबंधित काहीसा दिलासा दिला आहे.
  • आरबीआयने व्हिडिओच्या आधारे केवायसी अपडेट करण्याला मंजुरी दिली आहे.
  • . देशाबाहेर राहणाऱ्या नागरिकांसाठी कस्टमर आयडेंटिटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने एनबीएफसी, वॉलेट सेवा पुरवठा तसेच इतर वित्तीय संस्थांना केवायसी संबंधित काहीसा दिलासा दिला आहे. आरबीआयने व्हिडिओच्या आधारे केवायसी अपडेट करण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे केंद्रीय बॅंकेअंतर्गत येणाऱ्या नॉन-बॅंकिंग फायनान्शिअल कंपन्या, वॉलेट सेवा पुरवठादार, बॅंक आणि सर्व वित्तीय संस्थांना ग्राहकांचे केवायसी अर्थात कस्टमर ऑथेंटिकेशनच्या कार्यपद्धतीत मोठा दिलासा मिळणार आहे. 

केवायसी करण्यासाठी अनेकदा ग्राहकांना बॅंकेच्या किंवा संबंधित संस्थांच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्याचप्रमाणे एकदा केवायसी केलेले असतानाही कित्येकदा केवायसी नसल्याने काही महत्त्वाची कामं अपूर्ण राहतात. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, ते नसल्यामुळे अनेकदा आपली हातातील कामे सोडून तासनतास रांगेत उभे रहावे लागते. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांचा बराच वेळ वाचणार आहे.

गुरूवारी आरबीआयतर्फे जारी केल्या गेलेल्या नोटिफिकेशनप्रमाणे, ‘कस्टमर आयडेंटिफइकेशन प्रोसेस’साठी विनियमित संस्थांच्या डिजिटल चॅनलला चालना देण्याच्या विचारानुसार आरबीआयने व्हिडिओ आधारित कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेसला मंजुरी दिली आहे. देशाबाहेर राहणाऱ्या नागरिकांसाठी कस्टमर आयडेंटिटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या प्रणालीअंतर्गत वित्तीय संस्थांचे अधिकारी पॅन किंवा आधार कार्डच्या आधारावर काही प्रश्न विचारून ग्राहकांच्या ओळखीसंबंधित ठोस माहिती मिळवू शकतात. तसेच एजंट्सनादेखील जियो-कॉर्डिनेट्स म्हणून त्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. आरबीआयने दिलेला व्हिडिओचा पर्याय हा संबंधित बॅंक किंवा संस्थेच्या डोमेन साइटवरच उपलब्ध असणार आहे. यामध्ये ग्राहक थर्ड पार्टी सोर्स जसे गुगल डुओ किंवा व्हॉट्सअॅप कॉलमार्फत व्हिडिओ कॉल करू शकणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, यासाठी बॅंकांना आपल्या अॅप आणि वेबसाइटवर व्हिडिओ केवायसी प्रोसेससाठीची माहिती उपलब्ध करून देणारी लिंक द्यावी लागणार आहे. “ऑडिओ व्हिडिओ इंटरॅक्शन संबंधित संस्थांच्या वेबसाइटवरून होईल. तसेच त्यावेळी थर्ड पार्टीचा त्यात काहीही संबंध नसेल. हे सर्व काम स्पेशल ट्रेनिंग असणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत ऑपरेट केले जाईल, ज्यात त्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल. ही सुविधा कधीपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे याबाबत आरबीआयने अद्याप काही खुलासा केलेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी