RBI change Banking and Market Trading Hours : नवी दिल्ली : कोरोना संकट नियंत्रणात असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँका आणि मार्केट ट्रेडिंगच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार १८ एप्रिल २०२२ पासून देशातील सर्व बँका आणि मार्केट ट्रेडिंग सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होईल.
कोरोना संकटामुळे ७ एप्रिल २०२० पासून बँका आणि मार्केट ट्रेडिंगच्या वेळेत बदल करण्यात आला होता. बँका आणि मार्केट ट्रेडिंग सकाळी १० वाजल्यापासून सुरू होत होते. आता सोमवार १८ एप्रिल २०२२ पासून देशातील सर्व बँका आणि मार्केट ट्रेडिंग सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल.