Bank FD New Rule: बॅंकेत एफडी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रिझर्व्ह बॅंकेने केला नियमात बदल...पाहा काय होणार तुमच्यावर परिणाम

Bank Fixed Deposit update : बॅंकेचे व्याजदर आणि मुदतठेवीसंदर्भातील नियम सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. आता त्याच आघाडीवर रिझर्व्ह बॅंकेने मोठी माहिती दिली आहे. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांमधील मुदत ठेवी म्हणजे एफडीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. हे नवे नियम लागू देखील झाले आहेत.

New FD rule
मुदतठेवींवरील नवीन नियम 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयकडून मुदतठेवींसंदर्भातील नियमात मोठा बदल
  • देशातील सर्वच बॅंकांमध्ये नवीन नियम लागू
  • ग्राहकांसाठी नियमातील बदल खूप महत्त्वाचा

RBI Changed Fixed Deposit Rule : नवी दिल्ली : सर्वसामान्य माणूस आजही गुंतवणूक (Investment) म्हटली की बॅंकेतील मुदतठेवींमध्ये म्हणजे एफडीवर (Bank FD) पैसे गुंतवतो. त्यामुळे बॅंकेचे व्याजदर आणि मुदतठेवीसंदर्भातील नियम सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. आता त्याच आघाडीवर रिझर्व्ह बॅंकेने (RBI)मोठी माहिती दिली आहे. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांमधील मुदत ठेवी म्हणजे एफडीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल (RBI new FD rule) केला आहे. हे नवे नियम लागू देखील झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर बॅंकांमध्ये एफडीमध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर रिझर्व्ह बॅंकेच्या नवीन नियमांबद्दल माहित करून घ्या. नाहीतर तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. (RBI changed the bank fixed deposit rule)

अधिक वाचा : कतारमधील यंदाच्या FIFA World Cup काय आहे खास? वाचा

रिझर्व्ह बॅंकेचा नवा नियम लागू

तुम्हालादेखील बॅंकेत मुदतठेव किंवा एफडी करायची असेल आरबीआयच्या नियमाची माहिती करून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. नव्या नियमासंदर्भात आरबीआयने मोठी माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने बॅंकांमध्ये केल्या जाणाऱ्या एफडी नियमांमध्ये मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. शिवाय एफडीवरील नवीन नियम लागूदेखील आहेत. म्हणूनच एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आरबीआयच्या नवीन नियमांबद्दल समजून घ्या. नाहीतर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. 

रिझर्व्ह बँकेने अलीकडेच आपल्या रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर देशातील बँकांनीही एफडीचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ आता आरबीआयने एफडीचे नियम बदलले आहेत.

अधिक वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

एफडीवरील नवीन नियम काय आहे 

तुमच्या माहितीसाठी रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार  आतापासून जर तुम्ही एफडीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतरही तुमच्या रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळणार आहे. म्हणजेच यात मॅच्युरिटीनंतरदेखील एफडीतील रक्कम न काढल्यास तुमचे नुकसान होणार आहे. मॅच्युरिटीनंतर एफडीतील पैसे न काढल्यास मुदतीनंतर त्या रकमेवर मिळणारे हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहितीनुसार, जर तुमची मुदतठेवीचा कालावधी पूर्ण झाला असेल आणि त्यातील   रकमेवर दावा केला नाही किंवा ती रक्कम एफडीमधील काढली नाही तर त्या रकमेवर बचत खात्यानुसार व्याज दिले जाईल किंवा FD वरील निश्चित व्याज दिले जाईल. यापैकी जे कमी असेल ते लागू होईल. 

सर्व बँकांसाठी नियम लागू 

आरबीआयचे हे नवीन नियम सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर लागू होतील हे तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे.

अधिक वाचा  : मनुक्याचे पाणी मिळवू देऊ शकते या 4 आजारांपासून मुक्ती

उदाहरण पाहूया 

समजा जर तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव(FD)केली असेल आणि त्याचा कालावधी आज संपला असेल मात्र तुम्ही हे पैसे आज काढले नाहीत, तर पुढील कालावधीसाठी म्हणजे जोपर्यत तुम्ही पैसे काढत नाहीत तोपर्यत तुमच्या FD वरील व्याज आणि बचत खात्यावरील व्याज यातील जे कमी असेल तो लाभ तुम्हाला दिला जाईल. 

आधीचा नियम काय होता 

याआधी मात्र एफडीसंदर्भात वेगळा नियम होता. आधीच्या नियमानुसार जर तुम्ही एफडी मॅच्युअर्ड झाल्यानंतर क्लेम करत नसाल, तर त्यानंतरदेखील बँक तुमच्या एफडीचा कालावधी वाढवत आधीच्या एवढाच करत ती एफडी पुढे नते असे. शिवाय त्या एफडीवर असलेला व्याजदरच त्याला लागू व्हायचा. त्यामुळे एखादा ग्राहक एफडीतील पैसे काढायला विसरला तरी त्याचे आर्थिक नुकसान होत नसे. मात्र आता तसे होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर एफडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे काढून घेतले नाहीत किंवा एफडी रिन्यू केली नाही तर तुमचे नुकसान होईल.   


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी