RBI On Currency Notes: नोटांवर राहणार महात्मा गांधींचा फोटो, फोटो बदलणार नसल्याचे आरबीआयने दिले स्पष्टीकरण

Currency Notes : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI)आता चलनी नोटा ( Currency Notes) आणि नोटांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi)यांचे चित्र काढून टाकण्यासंदर्भात आपले स्पष्टीकरण जारी केले आहे. मागील काही दिवसांत सध्याच्या चलनात आणि नोटांमध्ये महात्मा गांधींचा फोटो बदलून आरबीआय इतर काही लोकांच्या फोटोसह नोटा छापण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येते आहे.

RBI clarification on Currency Notes
रिझर्व्ह बॅंकेचे चलनी नोटांसंदर्भात स्पष्टीकरण 
थोडं पण कामाचं
  • भारतीय चलनी नोटांवरील गांधीजींचा फोटो तसाच राहणार
  • रिझर्व्ह बॅंकेने ट्विट करत दिले स्पष्टीकरण
  • गांधींजींबरोबरच रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दूल कलामांचा फोटो छापला जाण्याचे वृत्त झाले होते प्रसिद्ध

RBI On Mahatma Gandhi On Currency Notes : नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI)आता चलनी नोटा ( Currency Notes) आणि नोटांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi)यांचे चित्र काढून टाकण्यासंदर्भात आपले स्पष्टीकरण जारी केले आहे. मागील काही दिवसांत सध्याच्या चलनात आणि नोटांमध्ये महात्मा गांधींचा फोटो बदलून आरबीआय इतर काही लोकांच्या फोटोसह नोटा छापण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येते आहे. मीडियामध्ये सुरू असलेल्या या बातमीसंदर्भात वस्तुस्थितीबद्दल स्पष्टीकरण देताना सत्य काय आहे हे आरबीआयने सांगितले आहे. (RBI Clarifies about Gandhiji's photo that no change in existing Currency and Banknotes)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 07 June 2022: सोन्यातील तेजी कायम, चांदीचा भावदेखील वधारला, पाहा ताजा भाव

आरबीआयने दिली माहिती 

भारतीय चलनाच्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधीचे चित्र असते. मात्र गांधीजींच्या जागी रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम (Former President APJ Abdul Kalam)यांच्या चित्रासह नोटांची नवीन मालिका छापण्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय विचार करत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून समोर आल्या आहेत. ही बातमी इतक्या वेगाने व्हायरल झाली की आरबीआयला या बातमीचे खंडन करावे लागले. रिझर्व्ह बँकेने ट्विट करून एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. सध्याच्या चलनात आणि नोटांमध्ये कोणतेही बदल केले जात नसल्याचे आरबीआयने स्पष्टपणे दिले आहे.

अधिक वाचा : Investment Tips : ईपीएफ, व्हीपीएफवरील करमुक्त 8.1% परतावा हा अजूनही इतर पर्यायांपेक्षा चांगला, कसे ते जाणून घ्या

बातम्यांमधून काय झाले होते प्रसिद्ध

प्रसारमाध्यमांमध्ये असे वृत्त आले आहे की आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग, अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसपीएमसीआयएल) (अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत) यांनी पमहात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम असलेले दोन भिन्न वॉटरमार्क सेट आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक दिलीप टी साहनी यांना पाठवले आहेत. जेणेकरून त्यापैकी एकाची निवड केल्यानंतर त्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवता येईल. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, 2020 मध्ये आरबीआयच्या अंतर्गत समितीने महात्मा गांधींव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांच्या चेहऱ्यासह नोट छापण्याची शिफारस केली होती. मात्र आरबीआयने याचे खंडन करत स्पष्टीकरण दिले आहे.

अधिक वाचा : IRCTC Tatkal Rail Ticket : रेल्वेचे कन्फर्म 'तत्काल तिकीट' मिळविण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स...

प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तात म्हटले होते की स्वातंत्र्यापासून आजवर भारतीय चलनी नोटांवर केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधींचाच फोटो छापला जात होता. पहिल्यांदाच गांधींव्यतिरिक्त इतर महापुरुषांचा फोटो भारतीय नोटांवर छापला जाणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यासाठी एकत्रित काम करत असून लवकरच याबाबतचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. टागोर आणि कलाम यांचे नोटांवर छापण्यासाठी वॉटरमार्क तयार झाले असून ते सिक्युरिटी मीटिंग अँड प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आले आहेत. 2017 साली नोटांच्या नव्या मालिकेची सुरक्षा वैशिष्ट्ये तपासण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक समिती स्थापन करण्यात आली होती. 2020 साली त्यांनी आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर नोटा छापताना महात्मा गांधींशिवाय रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्याही वॉटरमार्कचा नोटांवर उपयोग करण्याच्या संकल्पनेला ग्रीन सिग्लन मिळाल्यासंदर्भातील उल्लेख प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी