RBI fines on 4 cooperative banks | नियमांचे पालन ​​न केल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेने महाराष्ट्रातील 4 सहकारी बँकांना ठोठावला दंड!

Cooperative Banks update : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांच्या पालनासंदर्भातील त्रुटींसाठी चार सहकारी बँकांना एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या चारही सहकारी बॅंका महाराष्ट्रातीलच आहेत. चार स्वतंत्र पत्रकांनुसार, हे दंड नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहेत. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेसंदर्भात या दंडांचा हेतू नाही. रिझर्व्ह बँकेने "संचालक मंडळ आणि एक्सपोजर नियम आणि वैधानिक/इतर निर्बंध-UCBs"संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे प

RBI action on 4 cooperative banks
चार सहकारी बॅंकांना आरबीआयने केला दंड 
थोडं पण कामाचं
  • नियमांच्या पालनासंदर्भातील त्रुटींसाठी चार सहकारी बँकांना रिझर्व्ह बॅंकेने केला दंड
  • चारही सहकारी बॅंकांना मिळून एकूण 4 लाख रुपयांचा दंड
  • चारही सहकारी बॅंका महाराष्ट्रातीलच

RBI action on 4 cooperative banks : मुंबई  : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांच्या पालनासंदर्भातील त्रुटींसाठी चार सहकारी बँकांना एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या चारही सहकारी बॅंका महाराष्ट्रातीलच आहेत. अंदरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अंदरसुल (महाराष्ट्र) ( Andarsul Urban Co-operative Bank, Andarsul), महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक , अहमदपूर, (महाराष्ट्र) (Mahesh Urban Cooperative Bank, Ahmedpur), नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेड (The Nanded Merchant’s Cooperative Bank, Nanded, जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत, शहडोल (Jila Sahakari Kendriya Bank Maryadit, Shahdol)अशी या बॅंकांची नावे आहेत. (RBI fines penalties on 4 cooperative banks in Maharashtra for non compliance)

अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल

कोणत्या बॅंकेला किती दंड?

आरबीआयने अंदरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अंदरसुल (महाराष्ट्र) यांना 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक, अहमदपूर, महाराष्ट्राला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नांदेड मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक, नांदेडला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग नियमन कायदा 1949, ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी योजना 2014 आणि Know Your Customer या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत, शहडोल यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चार स्वतंत्र पत्रकांनुसार, हे दंड नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहेत. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेसंदर्भात या दंडांचा हेतू नाही. रिझर्व्ह बँकेने "संचालक मंडळ आणि एक्सपोजर नियम आणि वैधानिक/इतर निर्बंध-UCBs"संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल या बँकांना दंडाला सामोरे जावे लागत आहे.

अधिक वाचा : Linking PF account with PAN | तुमचे पीएफ खाते पॅनशी लिंक आहे का? नसेल तर लागेल दुप्पट कर...पाहा नवीन नियम आणि लिंक करण्याची पद्धत

आरबीआयकडून व्याजदरात बदल नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्याजदर पुन्हा एकदा स्थिर ठेवले आहेत. व्याजदरात कोणताही बदल आरबीआयने केलेला नाही. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das)यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय द्विमासिक पतधोरण समितीने (MPC)  रेपो दर 4 टक्केच ठेवण्यासंदर्भात एकमताने निर्णय घेतला. सलग अकराव्यांदा व्याजदर तसेच ठेवण्यात आले आहेत. रिव्हर्स रेपो दर देखील 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे, असे दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर सांगितले.

अधिक वाचा : Gold Price Today | लग्नसराईत मोठी संधी...सोन्याची झळाळी आणि चांदीची चमक घटली...पाहा ताजा भाव

आरबीआयच्या दर-निर्धारण पॅनेलने अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी आणि त्यात वाढ होण्यास पाठबळ देण्यासाठी अनुकूल धोरणाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. पतधोरण समितीने मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) 4.25% वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. मागील बैठकीतील 7.8 टक्के अंदाजावरून, आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेचा विकासदराचा अंदाज 7.2 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. चालू आर्थिक वर्षातील महागाई आता 5.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तीच फेब्रुवारीच्या बैठकीदरम्यान 4.5 टक्क्यांनी वाढली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी