Credit Card Bill Date : रिझर्व्ह बॅंकेने दिला मोठा दिलासा, आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्वतः बदलू शकता क्रेडिट कार्ड बिलाची तारीख

RBI new Rule : रिझर्व्ह बॅंकेने (RBI) क्रेडिट कार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ते त्यांच्या सोयीनुसार क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल (Credit Card Billing Cycle) निवडू शकतील. ते बदलण्याची संधी त्यांना एकदाच मिळेल. हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. आतापर्यंत, क्रेडिट कार्ड (Credit Card) ज्या तारखेला जारी केले जाते त्यानुसार बँकेद्वारे बिलिंग सायकल देखील निश्चित केली जात होती.

RBI new rule for credit cards
क्रेडिट कार्डासंदर्भातील आरबीआयचा नवा नियम 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयचा सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा
  • क्रेडिट कार्डाच्या बिलाची तारीख आता ग्राहकांना ठरवता येणार
  • क्रेडिट कार्डासंदर्भातील हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून लागू होणार

Change your Credit Card Bill Date : नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने (RBI) क्रेडिट कार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ते त्यांच्या सोयीनुसार क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल (Credit Card Billing Cycle) निवडू शकतील. ते बदलण्याची संधी त्यांना एकदाच मिळेल. हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. आतापर्यंत, क्रेडिट कार्ड (Credit Card) ज्या तारखेला जारी केले जाते त्यानुसार बँकेद्वारे बिलिंग सायकल देखील निश्चित केली जात होती. यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना क्रेडिट कार्ड जारी करण्यास किंवा विद्यमान कार्डांची मर्यादा वाढविण्यास किंवा ग्राहकांच्या मंजुरीशिवाय इतर सुविधा सुरू करण्यास मनाई केली आहे. याचे पालन न केल्यास संबंधित कंपन्यांना बिलाच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने कार्ड जारी केले आहे ती व्यक्ती आरबीआय लोकपालाकडे तक्रार करू शकते. दंडाची रक्कम लोकपाल ठरवेल. (RBI gives big relief to customers, as you can change your credit card billing cycle now) 

अधिक वाचा : Vehicle Insurance : वाहनधारकांनो...थर्ड पार्टी वाहन विमा महागला, 'या' तारखेपासून भरावा लागेल अधिक प्रीमियम...

धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई

मध्यवर्ती बँकेने कार्ड जारी करणार्‍या संस्था किंवा ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी एजंट म्हणून काम करणार्‍या तृतीय पक्षांना धमकावणे किंवा त्रास देणे देखील प्रतिबंधित केले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहेत.

अधिक वाचा : Privatization of Banks : सेंट्रल बँक ऑफ इंडियासह 2 बँकांचे खाजगीकरण होण्याची चिन्हे, पाहा काय आहे सरकारची संपूर्ण योजना

क्रेडिट कार्ड व्यवसाय कोणाला करता करेल

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 100 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असलेल्या व्यावसायिक बँका स्वतंत्रपणे किंवा कार्ड जारी करणार्‍या बँका/नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांच्याशी टाय-अप करून क्रेडिट कार्ड व्यवसाय करू शकतात. प्रादेशिक ग्रामीण बँकांना त्यांच्या प्रायोजकांसह किंवा इतर बँकांच्या भागीदारीत क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी आहे. RBI ने स्पष्ट केले आहे की NBFC त्यांच्या मंजुरीशिवाय क्रेडिट कार्ड व्यवसाय सुरू करणार नाहीत.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 27 May 2022: सोन्याच्या भावात कासवाच्या गतीने वाढ, चांदीची चमक वाढली, पाहा ताजा भाव

क्रेडिट कार्ड हॅकिंगचा धोका 

कोरोना महामारीनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital Transactions) मोठी वाढ झाली आहे. डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही (Cyber Crime) लक्षणीय वाढ झाली आहे. डिजिटल जगात सायबर गुन्हेगार आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक बनले आहेत. तुमचे क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि डेबिट कार्ड (Debit Card) अवघ्या 6 सेकंदात हॅक होऊ शकते. NordVPN ने अलीकडेच 140 देशांमधील 4 कोटी पेमेंट कार्ड्सचा अभ्यास जारी केला. या अभ्यासातून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड फक्त 6 सेकंदात हॅक (Hacking) केले जाऊ शकतात हे उघड झाले. तुम्ही काळजी घेतली नाही तर काही सेकंदातच तुम्ही कंगाल होऊ शकता.

संशोधन अहवालानुसार हे सायबर हल्ले किंवा सायबर गुन्ह्यांचे स्वरुप इतके वेगवान आहे की ग्राहकाला समजण्याची संधी मिळत नाही. फक्त काही सेकंदात त्याचे खाते रिकामे होते. NordVPN च्या CTO च्या मते, डार्क वेबवर मोठ्या संख्येने पेमेंट कार्ड मिळण्याचा एकच मार्ग आहे आणि ती पद्धत आहे Brute Forcing. या पद्धतीत हॅकर्स तुमच्या कार्ड नंबर आणि सीव्हीव्हीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी