Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल

Home Loan : महागाई आणि रोजगाराच्या आघाडीवर अनिश्चितता असताना, घर खरेदी करणाऱ्यांसाठी (Home Buyers) एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंकेने (RBI) गृहकर्ज स्वस्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले की ते गृहकर्जाशी (Home Loan) निगडीत जोखीम तर्कसंगत करणार आहेत. याअंतर्गत 31 मार्च 2023 पर्यंतच्या होमलोनला या सवलतीचा फायदा मिळणार आहे.

RBI Relaxes Loan-to-Value Rules for Home loan
आरबीआयने गृहकर्जासाठीचे निकष मार्च 2023 पर्यत शिथिल केले 
थोडं पण कामाचं
  • घर खरेदी करणाऱ्यांसाठी (Home Buyers) एक आनंदाची बातमी
  • आरबीआय गृहकर्जाशी (Home Loan) निगडीत जोखीम तर्कसंगत करणार
  • गृहकर्जाशी निगडीत जोखीम अधिक संतुलित करत 31 मार्च 2023 पर्यंत नवीन गृहकर्जांना त्याचा फायदा मिळणार

RBI Relaxes Loan-to-Value Rules : मुंबई : महागाई आणि रोजगाराच्या आघाडीवर अनिश्चितता असताना, घर खरेदी करणाऱ्यांसाठी (Home Buyers) एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंकेने (RBI) गृहकर्ज स्वस्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले की ते गृहकर्जाशी (Home Loan) निगडीत जोखीम तर्कसंगत करणार आहेत. याअंतर्गत गृहकर्जाशी निगडीत जोखीम अधिक संतुलित करत 31 मार्च 2023 पर्यंत नवीन गृहकर्जांसाठी कर्ज-ते-मूल्य (loan-to-value ratios)(LTV) गुणोत्तरांशी ती जोडण्यात येणार आहे. (RBI gives big Relief to Home Buyers by relaxing Loan-to-Value rules till March 2023)

अधिक वाचा : PAN-Aadhaar linking | तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल ते जाणून घ्या...करा मुदतीत पॅन-आधार लिंकिंग

रिअल इस्टेट चालना देण्यासाठीचा निर्णय

यासंदर्भातील तपशील देताना, आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, ऑक्टोबर 2020 मध्ये वैयक्तिक गृहकर्जासाठी जोखीम संतुलित करण्यात आली आणि ती  31 मार्च 2022 पर्यंत मंजूर केलेल्या सर्व नवीन गृहकर्जांसाठी कर्ज ते मूल्य (LTV) गुणोत्तरांशी जोडून तर्कसंगत करण्यात आली. ते पुढे म्हणाले की गृहनिर्माण क्षेत्राचे महत्त्व ओळखून, आरबीआयने या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

घर खरेदी वाढेल

आरबीआयच्या या पावलासंदर्भात जाणकारांचे म्हणणे आहे की कोरोना महामारीनंतर आलेले सध्याचे जागतिक राजकीय संकट हे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी सोनेरी किनार आहे. सुरक्षित मालमत्ता आणि सुरक्षित आश्रयस्थान गुंतवणूक असल्याने लोक रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. गृहकर्ज स्वस्त राहण्याची शक्यता असल्याने निवासी रिअल इस्टेटला आणखी चालना मिळेल. मार्च 2023 पर्यंत कर्ज-ते-मूल्य नियम शिथिल करण्याच्या निर्णयामुळे घर खरेदीदारांना निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे मागणीत आणखी वाढ होईल.

अधिक वाचा : Baba Ramdev | बाबा रामदेव यांची कमाल, एका झटक्यात रुचि सोया झाली कर्जमुक्त, कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी

घर खरेदीदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की कर्ज-ते-मूल्य (LTV) गुणोत्तर हे एक आर्थिक गुणोत्तर आहे. हे ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या आकाराची तुलना ग्राहक खरेदी करतील त्या मालमत्तेच्या मूल्याशी करते. साधारणपणे, कर्ज देणारे म्हणजे बॅंका गृहकर्ज किती धोकादायक आहे आणि ते मंजूर करायचे की नाही, हे ठरवण्यासाठी LTVs वापरतात.

अधिक वाचा : Anil Ambani update | अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी...गुंतवणुकदारांमध्ये शेअर खरेदीची स्पर्धा

रेपो रेटमध्ये बदल नाही

याआधी आरबीआयने 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या पहिल्याच पतधोरण समिती (MPC) च्या बैठकीत मुख्य कर्जदर म्हणजे रेपो दर स्थिर ठेवले आहेत. आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयच्या घोषणेनुसार, रेपो दर 4 टक्केच राहणार आहे. त्यामुळे, गृहकर्ज घेणारे कर्जदार जे लवचिक व्याजदराने सुलभ मासिक हप्ता भरतात, ते आता लागू असलेल्या व्याज दराने भरत राहतील.

आरबीआयच्या दर-निर्धारण पॅनेलने अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी आणि त्यात वाढ होण्यास पाठबळ देण्यासाठी अनुकूल धोरणाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. पतधोरण समितीने मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) 4.25% वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. मागील बैठकीतील 7.8 टक्के अंदाजावरून, आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेचा विकासदराचा अंदाज 7.2 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. चालू आर्थिक वर्षातील महागाई आता 5.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तीच फेब्रुवारीच्या बैठकीदरम्यान 4.5 टक्क्यांनी वाढली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी