गृह कर्जदारांना मोठा दिलासा, RBI ने घेतला मोठा निर्णय 

RBI Governor PC: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर

rbi governor shaktikanta das pc declared three month moratorium repo rate cut by 40 basis points
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकट काळात आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची तिसरी पत्रकार परिषद 
  • बँकेच्या रेपो रेटमध्ये केली कपात 
  • कर्जदारांना आपला हफ्ता न भरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ 

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. याच दरम्यान शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची ही तिसरी पत्रकार परिषद आहे. बँकेच्या रेपो रेटमध्ये ०.४० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे त्यामुळे आता हा रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे. तसेच कर्जदारांना सुद्धा या संकटकाळात मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर...

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची संपूर्ण पत्रकार परिषद

आज घोषित करण्यात आलेल्या उपायांना चार श्रेणींमध्ये विभागलं जाऊ शकतं. बाजारपेठेतील कामकाजात सुधारणा करणे, निर्यात आणि आयातीला पाठिंबा देणे, कर्ज सेवेवर सवलत देऊ आर्थिक ताण कमी करणे आणि कामकाजाच्या भांडवलावर अधिक चांगले करुन राज्यांच्या आर्थिक अडचणी कमी करणे. 

कर्जदारांना दिलासा: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना या अडचणीच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्यांचा हफ्ता भरण्यासाठी कर्जदारांना आणखी मुदत मिळाली आहे. यापूर्वी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे हफ्ते भरण्यासाठी कर्जदारांना मुभा दिली होती.

रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आरबीआयने ४० बेसिस पॉईंट्सने कपात केली आहे. आरबीआय गव्हर्नरने रेपो रेटमध्ये कपात केल्याने आता रबँकांचा रेपो रेट ४ टक्के इतका झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट दरातही ३.३५ टक्क्यांनी कपात केली आहे. औद्योगिक उत्पादनात होणारी घसरण आणि मागणीत झालेली घट यामुळे रेपो रेट दरात कपात योग्य आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता कर्जदारांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. कारण, त्यांच्या कर्जाचा व्याजदर ही कमी होण्यास मदत होणार आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची कोरोना संकट काळातील ही तिसरी पत्रकार परिषद होती. पहिल्या दोन पत्रकार परिषदांमध्ये आरबीआयने कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला होणारे नुकसान कमी करण्यासाठी अनेक उपाय योजनांची घोषणा केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी