FD Rules : रिझर्व्ह बॅंकेने बदलले एफडीचे नियम! जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान...

Bank FD : तुम्हीही मुदत ठेवींमध्ये (Bank FD) पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आरबीआयने (RBI)एफडीशी संबंधित नियम बदलले आहेत. मुदतठेवींशी संबंधित नवीन नियम (New FD Rules) लागू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरांमध्ये वाढ करण्यास सुरूवात केली आहे.

RBI rule on FD maturity
मुदतठेवीसंदर्भातील आरबीआयचे नवे नियम 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयने मुदतठेवीशी संबंधित नियम बदलले
  • नवीन नियम काही दिवसांपूर्वीच लागू झाले
  • एफडीचा कालावधी पूर्ण झाल्यास लगेच काढा पेसै नाहीतर होईल नुकसान

FD Rules Changed : नवी दिल्ली : तुम्हीही मुदत ठेवींमध्ये (Bank FD) पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आरबीआयने (RBI)एफडीशी संबंधित नियम बदलले आहेत. मुदतठेवींशी संबंधित नवीन नियम (New FD Rules) लागू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरांमध्ये वाढ करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एफडीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी जरा योग्यरित्या पावले उचला. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. (RBI have changed the FD rules, know it otherwise you will face lose)

मुदतठेवीच्या मॅच्युरिटीचे नियम बदलले

वास्तविक, आरबीआयने फिक्स्ड डिपॉझिट (FD) च्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे की आता मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या, बँका सर्वसाधारणपणे 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीच्या मुदतठेवीवर 5% पेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावरील व्याजदर जवळपास 3 ते 4 टक्के इतके आहेत.

अधिक वाचा : Bank Holidays June 2022: जून महिन्यात इतके दिवस बँकांना असणार सुट्ट्या, पाहा संपूर्ण यादी

आरबीआयने जारी केला हा आदेश

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर मुदत ठेव परिपक्व झाली आणि रक्कम दिली गेली नाही किंवा दावा केला गेला नाही, तर बचत खात्यानुसार त्यावर व्याज दर किंवा परिपक्व झालेल्या एफडीवर निश्चित केलेला व्याज दर, यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. . सर्व व्यापारी बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू होतील.

अधिक वाचा : Bank FD Rates : एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक; तुमच्यासाठी कोणती एफडी आहे फायद्याची?

नियम काय म्हणतात ते जाणून घ्या

हे अशा प्रकारे समजून घ्या की, समजा तुमच्याकडे 5 वर्षांची मॅच्युरिटी असलेली एफडी आहे, जी आज मॅच्युअर्ड झाली आहे. परंतु तुम्ही हे पैसे काढत नाही, तर यावर दोन स्थिती असतील. जर मुदतठेवीवर मिळणारे व्याज त्या बँकेच्या बचत खात्यावरील व्याजापेक्षा कमी असेल तर तुम्हाला मुदतठेवीवरील व्याजदर मिळत राहील. जर एफडीवरील व्याज बचत खात्यावरील व्याजापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला मुदतपूर्तीनंतर बचत खात्यावरील व्याजदराने व्याज मिळेल.

अधिक वाचा : RBI Alert: सावधान! बाजारात 500 आणि 2000 च्या बनावट नोटांमध्ये झाली 100% वाढ, आरबीआयने सांगितले खऱ्या आणि बनावट नोटा कशा ओळखायच्या...

जुना नियम काय होता?

याआधी, जेव्हा तुमच्या मुदतठेवीचा कालावधी पूर्ण व्हायचा आणि त्यानंतरदेखील ती काढली नाही किंवा त्यावर दावा केला नाही, तर बँक तुमच्या मुदतठेवीला त्याच कालावधीसाठी वाढवत असे ज्यासाठी तुम्ही आधी मुदतठेव केली होती. पण आता असे होणार नाही. पण आता मुदतपूर्तीवर पैसे काढले नाहीत तर त्यावर एफडीचे व्याज मिळणार नाही. त्यामुळे मुदतपूर्तीनंतर लगेच पैसे काढणे तुमच्या फायद्याचे असणार आहे. 

मागील काही दिवसांपासून अनेक बॅंकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली असून एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी