RBI Hike Repo Rate in Marathi: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक पार पडल्यानंतर आता पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्ज आणखी महागणार आहे. यामुळे महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे.
देशातील महागाईचा दर कमी व्हावा यासाठी आरबीआयने सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने 0.25 बेसिस पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यामुळे आता हा दर 6.50 % वर पोहोचला आहे. यामुळे आता होम लोनपासून ते पर्सनल लोन सर्व महागणार आहे. म्हणजेच तुमचा लोन ईएमआय आणखी वाढणार आहे.
Monetary Policy Statement by Shri Shaktikanta Das, RBI Governor - February 08, 2023 https://t.co/KGPgzXbpWN — ReserveBankOfIndia (@RBI) February 8, 2023
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी तीन दिवसीय एसपीसी बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी यापूर्वीच रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये व्याज दरात वाढ करुन 5.90 टक्क्यांवरुन 6.25 टक्के इतका करण्यात आला होता. आरबीआयने गेल्या वर्षात आतापर्यंत सहा वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. सहा वेळा रेपो रेटमध्ये वाढ करत आरबीआयने 2.50 टक्क्यांची वाढ केली आहे.
हे पण वाचा : हे संकेत दिसल्यास समजून जा तुमची किडनी खराब झालीय
एमपीसी बैठकीत सहभागी सहा सदस्यांपैकी चार सदस्यांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्याचं समर्थन केलं. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं, आर्थिक वर्ष 2023 मध्ये महागाई 4 टक्क्यांहून अधिक राहिली आहे आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रिअल जीडीपी 6.4 टक्क्यांपर्यंत राहू शकते.