RBI Directions under Banking Regulation Act : RBI ची 5 सहकारी बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील 2 बँकांचा समावेश; पैसे काढण्यावर आले निर्बंध

RBI imposed restrictions on 5 Co-operative Banks : ढासळत्या आर्थिक स्थितीची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने भारतातील 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. ज्या 5 बँकांवर निर्बंध लागू झाले आहेत त्यातील 2 सहकारी बँका महाराष्ट्रातील आहेत.

RBI imposed restrictions on 5 Co-operative Banks
RBI ची 5 सहकारी बँकांवर कारवाई  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • RBI ची 5 सहकारी बँकांवर कारवाई
  • महाराष्ट्रातील 2 बँकांचा समावेश
  • पैसे काढण्यावर आले निर्बंध

RBI imposed restrictions on 5 Co-operative Banks : ढासळत्या आर्थिक स्थितीची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने भारतातील 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. ज्या 5 बँकांवर निर्बंध लागू झाले आहेत त्यातील 2 सहकारी बँका महाराष्ट्रातील आहेत. निर्बंध घातलेल्या बँकांमधून रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या कमाल मर्यादेएवढेच पैसे काढण्याची परवानगी खातेदारांना आहे. 

रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या बँकांना नव्याने कोणालाही कर्ज देण्यास, कर्ज वितरित करण्यास, नव्याने गुंतवणूक करण्यास, मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यास बंदी आहे. आधी दिलेल्या कर्जांची वसुली करून आर्थिक स्थिती सुधारा असा स्पष्ट इशारा रिझर्व्ह बँकेने संबंधित सहकारी बँकांना दिला आहे.

कारवाई केलेल्या 5 बँकांव्यतिरिक्त 3 बँकांवरील निर्बंधांच्या मुदतीत रिझर्व्ह बँकेने वाढ केली आहे. यात महाराष्ट्रातील 2 बँकांचा समावेश आहे.  ही कारवाई 17 ते 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा 1949 मधील सेक्शन 35 ए आणि सेक्शन 56 यात नमूद तरतुदींच्या आधारे सहकारी बँकांवर निर्बंधांच्या रुपात कारवाई केली आहे.

महाराष्ट्रातील आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादीत आणि  शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक लिमिटेड या दोन बँकांवर कारवाई करून निर्बंध घालण्यात आले. तसेच मलकापूर शहरी सहकारी बँक लिमिटेड आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या दोन बँकांवरील निर्बंधांच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवरील निर्बंधांच्या मुदतीत 17 फेब्रुवारी 2023 रोजी वाढ करण्यात आली. आता या बँकेवर 17 मे 2023 पर्यंत निर्बंध लागू असतील. या बँकेवर 18 मे 2018 पासून निर्बंध लागू आहेत.

मलकापूर शहरी सहकारी बँक लिमिटेड या बँकेवरील निर्बंधांच्या मुदतीत 24 फेब्रुवारी 2023 रोजी वाढ करण्यात आली. आता या बँकेवर 24 मे 2023 पर्यंत निर्बंध लागू असतील. या बँकेवर 24 नोव्हेंबर 2021 पासून निर्बंध लागू आहेत.

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची एवढी पगारवाढ होणार? या दिवशी निर्णय होणार?

Petrol Pump Fraud : सावधान, पेट्रोल पंपावर सुरू आहे फसवणूक, नुकसान टाळण्यासाठी हा आहे उपाय

रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेल्या सहकारी बँका

  1. आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादीत, औरंगाबाद, महाराष्ट्र
  2. शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक लिमिटेड, अकलुज, महाराष्ट्र
  3. मलकापूर शहरी सहकारी बँक लिमिटेड, बुलढाणा, महाराष्ट्र (निर्बंधांना मुदतवाढ)
  4. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, महाराष्ट्र  (निर्बंधांना मुदतवाढ)
  5. एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लखनऊ, उत्तर प्रदेश
  6. उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाउन बँक लिमिटेड, उरावकोंडा, अनंतपुर, आंध्र प्रदेश
  7. शिमशा सहकारा बैंक नियमिता, मद्दुर, मांड्या, कर्नाटक
  8. थोडुपुझा अर्बन को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, नंबर 394, केरळ (निर्बंधांना मुदतवाढ)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी