RBI चे नवे निर्बंध; महाराष्ट्रातल्या 'या' बँकेला दणका, ठेवीदारांना काढता येणार फक्त इतके पैसे

काम-धंदा
Pooja Vichare
Updated Jul 19, 2022 | 12:08 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर (Raigad Cooperative Bank) निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

RBI
भारतीय रिझर्व्ह बँक 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर (Raigad Cooperative Bank) निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
  • या बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यानं आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
  • ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं (RBI) घेतला आहे.

मुंबई:  भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर (Raigad Cooperative Bank) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यानं आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने लादलेल्या नव्या निर्बंधामुळे ठेवीदारांना खात्यातून केवळ 15 हजार रूपये काढता येणार आहे. बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे.

ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं (RBI) घेतला आहे. आरबीआयनं लादलेले हे निर्बंध 6 महिन्यांसाठी असतील. आरबीआयनं जारी केलेल्या निवेदनात हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

अधिक वाचा-  ४ वर्षीय चिमुरडीसोबत नराधमाने केला अत्याचार, चॉकलेटच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार
 
रायगड सहकारी बँकेवरील निर्बंधाची माहिती देताना आरबीआनं म्हटलं की, बँकेवरील निर्बंध 6 महिन्यांसाठी लागू असतील. यामुळे ठेवीदारांना बचत, चालू किंवा अन्य कोणत्याही खात्यातून एकूण रक्कमेपैकी 15 हजारांपेक्षा कमी रक्कम काढता येईल. त्यामुळे खात्याच्या ठेवीदारांना 15 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुढे RBI नं स्पष्ट केलं की, रायगड सहकारी बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले आहे. त्यांचा बँकिंग परवाना रद्द केला नाही.  बँकेची आर्थिक स्थिती निर्बंधांसह बँकेला बँकिंग व्यवसाय करता येऊ शकेल असंही आरबीआयने म्हटलं आहे.  

आरबीआयनं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती चांगली होत नाही तोपर्यंत बँकेचे कामकाज सुरू असेल. बँकेचे स्थिती सुधरल्यास निर्बंधांमध्ये बदल होऊ शकतात. रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लावल्या प्रमाणेच बीड येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर नियमांचे उल्लंघन केल्याने 6 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

निवेदनात पुढे स्पष्ट केलं की, या बँकेनं फसवणूक- वर्गीकरण आणि अहवालाबाबतच्या नियमांचं उल्लंघन केले आहे. त्यामुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. या बँकेच्या ठेवीदारांवर आरबीआयच्या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी