RBI | महाराष्ट्रातील या बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध, १०,००० पर्यतच रक्कम काढता येणार

RBI | मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआय खातेधारकांवर रोख रक्कम काढण्यावर मर्यादा घातली असून खातेधारकांना १०,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे आरबीआयने पाऊल उचलले आहे.

RBI
आरबीआयकडून सहकारी बॅंकेवर निर्बंध 
थोडं पण कामाचं
  • रिझर्व्ह बॅंकेकडून आणखी एका सहकारी बॅंकेवर निर्बंध
  • आरबीआयकडून मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर निर्बंध
  • खातेधारकांना कमाल १०,००० रुपयेच काढता येणार

RBI | मुंबई : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बॅंकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या बॅंकेच्या खातेधारकांना आणि बॅंकेला आरबीआयच्या निर्बंधांनुसार आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर (Malkapur Urban Co-operative bank) रिझर्व्ह बॅंकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआय खातेधारकांवर (Account holder) रोख रक्कम काढण्यावर मर्यादा घातली असून खातेधारकांना १०,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम (Cash withdrawal) काढता येणार नाही. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे आरबीआयने पाऊल उचलले आहे. यामुळे आता बॅंकेला कोणताही आर्थिक व्यवहार करताना आरबीआयकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. (RBI imposes restrictions on Malkapur Urban Co-operative bank)

सहा महिन्यांसाठी निर्बंध

आरबीआयने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर निर्बंध घातल्याचा फटका बॅंकेच्या खातेधारकांना बसणार आहे. शिवाय बॅंकेलादेखील यापुढे कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. बॅंकेला कर्जवितरणदेखील करता येणार नाही. बॅंकेला कोणताही आर्थिक व्यवहार करताना रिझर्व्ह बॅंकेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. आरबीआयने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. आरबीआयच्या देखरेखीखालीच बॅंकेला आपले व्यवहार करावे लागणार आहेत. 

पीएमसी बॅंक

याआधी आरबीआयने पीएमसी बॅंकेवरदेखील निर्बंध घातले आहेत. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत (यूएसएफबी) विलीन करण्याची योजना रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे. पीएमसी बँकेतील ठेवी, कर्ज, थकीत कर्ज तसेच पीएमसी बँकेचे उत्पन्न, मालमत्ता, सर्व शाखा यांचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पूर्ण हस्तांतरण केले जाईल. ज्यांनी पीएमसी बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पुढील हप्ते भरावे लागतील. या व्यवस्थेमुळे पीएमसी बँकेतील सर्व ठेवीदारांच्या सगळ्या ठेवींना संरक्षण मिळेल.

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक करुन झाली आहे. साधारणपणे अशा स्वरुपाच्या बँकेच्या स्थापनेसाठी किमान २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाते. पण युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. यामुळे विलीनीकरणानंतर पीएमसी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवींना (यूएसएफबीमध्ये सुरक्षित संरक्षण मिळणार आहे.

आरबीआयने 'सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लि.'ला 'ऑन टॅप' लायसन्सिंगद्वारे लघु वित्तीय बॅंक स्थापन करण्याची तत्वत: मंजूरी दिली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये पीएमसी बॅंकेवर निर्बंध घालण्यात आले होते. पीएमसी बॅंकेतून पैसे काढण्यावरदेखील आरबीआयने मर्यादा घातली होती. त्यामुळे पीएमसी बॅंकेच्या खातेधारकांनी आपले पैसे परत मिळावेत यासाठी अनेकवेळा निदर्शनेदेखील केली होती. आता रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेचे अधिग्रहण करून बॅंकेचे रुपांतरण स्मॉल फायनान्स बॅंकेत करण्यास सेंट्रमला मंजूरी दिली आहे. सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसने १ फेब्रुवारी २०२१ला पीएमसी बॅंकेच्या अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव सादर केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी