पीएमसी बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन करणार

RBI issues draft scheme for takeover of PMC Bank by Unity Small Finance Bank पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत (यूएसएफबी) विलीन करण्याची योजना रिझर्व्ह बँकेने जाहीर केली.

RBI issues draft scheme for takeover of PMC Bank by Unity Small Finance Bank
पीएमसी बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन करणार 
थोडं पण कामाचं
  • पीएमसी बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन करणार
  • योजना रिझर्व्ह बँकेने जाहीर केली
  • पीएमसी बँकेतील सर्व ठेवीदारांच्या सगळ्या ठेवींना संरक्षण मिळेल

RBI issues draft scheme for takeover of PMC Bank by Unity Small Finance Bank मुंबईः पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत (यूएसएफबी) विलीन करण्याची योजना रिझर्व्ह बँकेने जाहीर केली.

पीएमसी बँकेतील ठेवी, कर्ज, थकीत कर्ज तसेच पीएमसी बँकेचे उत्पन्न, मालमत्ता, सर्व शाखा यांचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पूर्ण हस्तांतरण केले जाईल. ज्यांनी पीएमसी बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पुढील हप्ते भरावे लागतील. या व्यवस्थेमुळे पीएमसी बँकेतील सर्व ठेवीदारांच्या सगळ्या ठेवींना संरक्षण मिळेल.

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक करुन झाली आहे. साधारणपणे अशा स्वरुपाच्या बँकेच्या स्थापनेसाठी किमान २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाते. पण युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. यामुळे विलीनीकरणानंतर पीएमसी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवींना (यूएसएफबीमध्ये सुरक्षित संरक्षण मिळणार आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही सेंट्रम ग्रुप (Centrum Group) आणि भारतपे (Bharatpe) यांचा संयुक्त उपक्रम आहे. या बँकेची सुरुवात युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (Unity Small Finance Bank Limited) या संस्थेने लघु वित्त पुरवठादार बँकेच्या स्वरुपात १ नोव्हेंबर २०२१ पासून केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी