व्याजदर स्थिर, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

RBI keeps policy rates unchanged, projects GDP growth of 10.5 percent रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पहिले पतधोरण जाहीर केले.

RBI keeps policy rates unchanged, projects GDP growth of 10.5 percent
व्याजदर स्थिर, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर 

थोडं पण कामाचं

  • व्याजदर स्थिर, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर
  • रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के
  • देशाची १०.५ टक्के दराने ग्रोथ होईल

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पहिले पतधोरण जाहीर केले. वाढत्या कोरोना संकटाची दखल घेत रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के राहणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली. RBI keeps policy rates unchanged, projects GDP growth of 10.5 percent

यंदाच्या आर्थिक वर्षात देशाची १०.५ टक्के दराने ग्रोथ होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला. कोरोना संकट लवकर नियंत्रणात आले नाही तर आर्थिक प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली. रिझर्व्ह बँकेने याआधी फेब्रुवारी २०२१ मध्ये जाहीर केलेल्या पतधोरणातही व्याजदर स्थिर ठेवले होते. 

आर्थिक वाढ स्थिरावली नसल्यामुळे व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. त्यांनी कोरोना संकट फार वाढले नाही तर देश यंदा १०.५ टक्के दराने आर्थिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला. देशात पुरेशी रोख रक्कम उपलब्ध राहील याची खबरदारी घेत असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले.

सध्या महागाईचा दर पाच टक्क्यांच्या आसपास घुटमळत आहे. हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. महागाई वाढली तरी जास्तीत जास्त ५.२ टक्के दराने वाढेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला. याआधी जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान महागाईचा दर ५ टक्के होता. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार २०२१-२२च्या तिसऱ्या तिमाहीत महागाईचा ४.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी