UPI Payment Charges ; मुंबई : यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) भारतात खुप लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट पर्याय (Online Payment option) आहे. या पेमेंटमधून एका क्षणात पैसे ट्रान्सफर (money transfer) होतात. यासाठी कुठलेही शुल्क (zero charges) आकारले जात नाही. परंतु आगामी काळात यासाठीही पैसे मोजावे (charges) लागतील. कारण रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) यावर शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. (rbi may charge on upi payments rbi appeal to people for feedback)
युपीआय पेमेंटवर रिझर्व्ह बँक शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. आरबीआयने एक पत्रक जारी करून म्हटले आहे की, UPI सुद्धा एक IMPS प्रमाणे पैसे ट्रान्सफर करण्याची प्रणाली आहे. म्हणूनच IMPS प्रमाणे UPI ट्रान्सफर ट्रांझेक्शनवर शुल्क लागावे असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. वेगळ्या वेगळ्या पेमेंटवर शुल्क आकारावे असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. यासाठी बँकांना पायाभूत सुविधा बनवावी लागते. तसेच कुठलाही धोक्याशिवाय हे व्यवहार होण्यासाठी बँकेला यंत्रणा निर्माण करून राबवावी लागते आणि त्यासाठी बँकांना पैसे खर्च करावे लागतात. म्हणून यासाठी रिझर्व्ह बँकेने सामान्य नागरिकांकडून याबद्दल अभिप्राय मागवला आहे. तीन ऑक्टोबर पर्यंत नागरिकांनी इमेलच्या माध्यमातून आपला अभिप्राय कळवावा असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.
Reserve Bank of India releases Discussion Paper on Charges in Payment Systemshttps://t.co/G7B32AF3xK — ReserveBankOfIndia (@RBI) August 17, 2022
रिझर्व्ह बँक फक्त युपीआय नव्हे तर डेबिट कार्ड ट्रांझेक्शनवरही शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. सध्या डेबिट कार्डच्या ट्रांझेक्शनवर कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=54217
अधिक वाचा : government jobs : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड