होम लोन आणि कार लोन महागणार

rbi monetary policy december 2022, home loan car loan emi increase soon : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो रेट वाढवत असल्याचे जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने 5.90 टक्के असलेल्या रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांची वाढ करत असल्याचे जाहीर केले.

rbi monetary policy december 2022
होम लोन आणि कार लोन महागणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • होम लोन आणि कार लोन महागणार
  • रिझर्व्ह बँकेने 5.90 टक्के असलेल्या रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांची वाढ केली
  • रेपो रेट 6.25 टक्के होणार

rbi monetary policy december 2022, home loan car loan emi increase soon : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो रेट वाढवत असल्याचे जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने 5.90 टक्के असलेल्या रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांची वाढ करत असल्याचे जाहीर केले. यामुळे रेपो रेट 6.25 टक्के होणार आहे. रिझर्व्ह बँकेने मे 2022 ते 7 डिसेंबर 2022 या सुमारे 5 महिन्यांच्या काळात रेपो रेट 2.25 टक्क्यांनी वाढवला. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे लवकरच सर्व प्रकारच्या कर्जांच्या (Loan) हप्त्यांमध्ये (Equated Monthly Installment - EMI) वाढ होणार आहे. बँकांकडून कर्जाच्या वाढलेल्या व्याजदराची घोषणा होईल. 

गृहकर्ज (Home Loan / होम लोन), वाहन कर्ज (Car Loan or Vehicle Loan / कार लोन किंवा व्हेईकल लोन) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan / पर्सनल लोन) या स्वरुपात कर्ज घेणाऱ्यांची देशातील संख्या मोठी आहे. रेपो रेट वाढल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांच्या हप्त्यांमध्ये वाढ होणार आहे.

Mudra Loan: बिझनेस वाढवायचा आहे? काळजी नको, सरकार 'या' योजनेतून त्वरीत देईल 10 लाख रुपयांचे कर्ज

Business Ideas: पुष्पा चित्रपटाच्या लाल चंदनासारखा पैसा आहे या व्यवसायात...आयुष्यभर कमाईच कमाई

ज्यांनी 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे त्यांना आधी 8.55 टक्क्यांच्या व्याजदराने 43 हजार 550 रुपयांचा हप्ता भरावा लागत होता. आता या कर्जदारांना 8.90 टक्क्यांच्या व्याजदराने 44 हजार 665 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. हप्त्याच्या मासिक रकमेत 1115 रुपयांची वाढ होईल. हप्त्यांच्या वार्षिक (12 महिने) रकमेत 13 हजार 380 रुपयांची वाढ होईल.

ज्यांनी 3 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतले आहे त्यांना आधी 8.40 टक्क्यांच्या व्याजदराने 15 हजार 761 रुपयांचा हप्ता भरावा लागत होता. आता या कर्जदारांना 8.75 टक्क्यांच्या व्याजदराने 15 हजार 842 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. हप्त्याच्या मासिक रकमेत 81 रुपयांची वाढ होईल. हप्त्यांच्या वार्षिक (12 महिने) रकमेत 972 रुपयांची वाढ होईल. 

ज्यांनी 5 वर्षांसाठी 7 लाख 50 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्यांना आधी 8.40 टक्क्यांच्या व्याजदराने 16 हजार 139 रुपयांचा हप्ता भरावा लागत होता. आता या कर्जदारांना 8.75 टक्क्यांच्या व्याजदराने 16 हजार 269 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. हप्त्याच्या मासिक रकमेत 130 रुपयांची वाढ होईल. हप्त्यांच्या वार्षिक (12 महिने) रकमेत 1560 रुपयांची वाढ होईल. 

कर्जाचा जास्त भार जाणवू नये यासाठी कर्जदार वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेशी बोलून कर्जफेडीची मुदत वाढवून घेऊ शकतात. तसेच समान रकमेच्या मासिक हप्त्यांमध्ये वाढ करून घेऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी