रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, आर्थिक स्थितीचा आढावा घेणार

RBI monetary policy panel meeting from October 7-9 तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक उद्यापासून (बुधवार, ७ ऑक्टोबरपासून) सुरू होणार

RBI monetary policy panel meeting from October 7-9
रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, आर्थिक स्थितीचा आढावा घेणार 

थोडं पण कामाचं

  • रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, आर्थिक स्थितीचा आढावा घेणार
  • गोयल, वर्मा, भिडे यांची RBIच्या पतधोरण समितीवर नियुक्ती
  • २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण निश्चित करणार

मुंबईः रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India - RBI) महत्त्वाची बैठक उद्यापासून (बुधवार, ७ ऑक्टोबरपासून) सुरू होणार आहे. ही बैठक ९ ऑक्टोबर पर्यंत चालेल. या बैठकीत देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा (review eocnomy) घेतला जाईल. रिझर्व्ह बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण (third monetary policy) निश्चित केले जाईल. तिसऱ्या तिमाहीच्या पतधोरणासाठी आधी २८ सप्टेंबर रोजी रोजी बैठक होणार होती. मात्र समितीच्या स्वतंत्र सदस्यांची नियुक्ती रखडली होती त्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली. (RBI monetary policy panel meeting from October 7-9)

गोयल, वर्मा, भिडे यांची RBIच्या पतधोरण समितीवर नियुक्ती

पतधोरण आखण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या समितीवर (Monetary Policy Committee - MPC) केंद्र सरकारकडून स्वतंत्र सदस्यांची नियुक्ती केली जाते. आधी या समितीवर असलेल्या चेतन घाटे, पॅमी दुआ आणि रविंद्र ढोलकिया यांची मुदत संपली. त्यामुळे या तीन सदस्यांच्या जागेवर केंद्र सरकारने नव्या स्वतंत्र सदस्यांची नियुक्ती केली आहे. आता स्वतंत्र सदस्य म्हणून अशिमा गोयल (Ashima Goyal), जयंत आर. वर्मा (Jayanth R Varma) आणि शशांक भिडे (Shashanka Bhide) कार्यरत झाले आहेत. हे तिघेही अनुभवी अर्थतज्ज्ञ आहेत. 

२०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण निश्चित करणार

नव्या स्वतंत्र सदस्यांसह रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी आर्थिक धोरणाचा आढावा घेऊन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण निश्चित करतील. रिझर्व्ह बँक ताज्या महागाईच्या दराचा तसेच औद्योगिक प्रगतीचा दर, आर्थिक प्रगतीचा दर यांचाही आढावा घेणार आहे. व्याज दरांमध्ये बदल करायचे की नाही याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. अनेकदा आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याज दरांमध्ये चढउतार करते. हे करायचे झाल्यास किती प्रमाणात करावे याचा निर्णय होईल.

आरबीआयच्या साधनांचा विचारपूर्वक वापर होणार  

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das, Governor of the Reserve Bank of India) यांनी अलिकडेच आरबीआयच्या साधनांचा विचारपूर्वक वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. ताज्या परिस्थितीत तिसऱ्या तिमाही पतधोरणाद्वारे रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय़ करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

भारताजवळ पाच लाख ४२ हजार २१ अब्ज डॉलर एवढे परकिय चलन

भारताजवळ २५ सप्टेंबर रोजी पाच लाख ४२ हजार २१ अब्ज डॉलर एवढे परकिय चलन होते. देशात ३५ हजार ९९९ अब्ज डॉलर सोन्याचा राखीव साठा होता. या आकडेवारीत बैठक पुढे गेल्यामुळे काही चढउतार झाले असतील तर त्यांचाही आढावा घेतला जाईल. कोरोना संकटामुळे मंदावलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पतधोरणातून काही धा़डसी निर्णय घेतले जाणार का अशी एक चर्चा सुरू आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जे शक्य आणि आवश्यक आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न करेल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. वास्तवदर्शी आणि व्यावहारिक निर्णय घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी