Central Bank Digital Currency Launch : रिझर्व्ह बॅंकेच्या डिजिटल रुपीची प्रायोगिक सुरूवात 1 डिसेंबर 2022 पासून...पाहा महत्त्वाचे मुद्दे

Operationalization of Central Bank Digital Currency : रिझर्व्ह बँकेने 01 डिसेंबर 2022 रोजी रिटेल डिजिटल रुपया (e₹-R) साठी पहिली प्रायोगिक सुरूवात करण्याची घोषणा केली. हे लक्षात घेतले पाहिजे की रिझर्व्ह बॅंकेने 31 ऑक्टोबर 2022 ला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सूचित केले होते की डिजिटल रुपयामध्ये (e₹-R) प्रायोगिक सुरूवात महिनाभरात सुरू होईल.

pilot for retail digital Rupee
डिजिटल रुपीची प्रायोगिक सुरूवात 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयचा डिजिटल रुपया
  • 1 डिसेंबर 2022 पासून प्रायोगिक सुरूवात
  • पाहा महत्त्वाचे मुद्दे

Pilot for retail digital Rupee : नवी दिल्ली : डिजिटल युगाची साद लक्षात घेऊन भारतीय रुपयाच्या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलताना आरबीआयने डिजिटल रुपयाची (Digital Rupee) तयारी याआधीच सुरू केली होती. आता रिझर्व्ह बँकेने (RBI) 01 डिसेंबर 2022 ला रिटेल डिजिटल रुपयाच्या  (e₹-R)प्रायोगिक वापराची सुरवात करण्याची घोषणा केली आहे. याआधीच रिझर्व्ह बॅंकेने 31 ऑक्टोबर 2022 ला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की डिजिटल रुपयाची प्रायोगिक सुरूवात महिनाभरात होईल. जगभरात डिजिटल चलनांवर(Digital Currency) जोरात काम सुरू असून सर्वच प्रगतीशील देश डिजिटल चलन वापरात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातदेखील डिजिटल रुपयाची अंमलबजावणी करण्याचा आराखडा रिझर्व्ह बॅंकेने आखला असून त्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. डिजिटल रुपयाची प्रायोगिक अंमलबजावणी करताना त्याचा वापर काही निवडक ठिकाणांवर केला जाणार असून त्यामध्ये काही ग्राहक आणि व्यापारी सहभागी असणार आहेत. (RBI pilot for retail digital Rupee to be operationalize on December 01, 2022 read in Marathi )

अधिक वाचा  :  व्हॉट्सअ‍ॅपने लॉंच केले एक नवीन धमाल फीचर, स्वत:ला मेसेज करा

आरबीआयची घोषणा

रिझर्व्ह बॅंकेने ट्विट करून डिजिटल रुपयाच्या प्रायोगिक अंमलबजावणीची घोषणा केली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 01 डिसेंबर 2022 पासून प्रायोगिक अंमलबजावणी सुरू होताना यात एक निवडक गटाद्वारे ही अंमलबजावणी केली जाणार आहे या खास गटात म्हणजे क्लोज्ड यूजर ग्रुप (CUG)मध्ये काही निवडक ग्राहक आणि व्यापारी यांचा समावेश असणार आहे. देशातील काही निवडक ठिकाणी हे अंमलात आणले जाणार आहे.

अधिक वाचा - Garlic Benefits in Winter: हिवाळ्यात असे करा लसणाचे सेवन...अनेक आजार पळतील दूर

कशी होणार अंमलबजावणी

डिजिटल रुपीची (e₹-R) प्रायोगिक अंमलबजावणी कशी केली जाणार यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार डिजिटल रुपया हा डिजिटल टोकनच्या स्वरुपात दिला जाईल. हे एकप्रकारचे कायदेशीर चलनच असेल. कागदी नोटा किंवा नाणी जशी जारी केली जातात तशाच मूल्यांमध्ये हा डिजिटल रुपयादेखील त्याच मूल्यांमध्ये जारी केला जाईल. निवडक ग्राहक आणि व्यापाऱ्यांना तो काही निवडक बॅंकांमार्फत वितरित केला जाईल. या डिजिटल रुपयाच्या वापरासाठी बॅंकांकडून या ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर किंवा डिजिटल उपकरणांवर डिजिटल वॉलेट दिलेले असणार आहे. या डिजिटल वॉलेटचा वापर करून डिजिटल रुपयाचे व्यवहार केले जातील. हे व्यवहार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका व्यक्तीकडून व्यापाऱ्याकडे अशा स्वरुपात केला जातील. ज्याप्रमाणे आपण आता एखाद्या दुकानावर क्यूआर कोडचा वापर करून पेमेंट करतो त्याचप्रमाणे डिजिटल रुपयाचेही पेमेंट करता येणार आहे. अर्थात बॅंकेत ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळते तसे या डिजिटल रुपीवर मिळणार नाही. मात्र बँकांमधील ठेवींप्रमाणे इतर पैशांमध्ये या डिजिटल रुपीला रूपांतरित केले जाऊ शकते.

डिजिटल रुपयाच्या प्रायोगिक अंमलबजावणीमधील सर्व व्यवहार हे प्रत्यक्ष चालू वेळेनुसारच होणार आहेत. हा रुपया आणि यंत्रणा किती सक्षम आहे हे यातून तपासले जाणार आहे. डिजिटल रुपयाशी निगडीत शिकण्यास आलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्ये आणि आराखडा यासंदर्भातील घटकांची चाचणी भविष्यातील प्रायोगिक अंमलबजावणीद्वारे केली जाणार आहे.

अधिक वाचा - जीवनात नव्याने भरतील रंग, या Relationship Tips ने वैवाहिक आयुष्यात होईल दंग

कोणत्या बॅंकांचा समावेश असणार

डिजिटल रुपयाच्या प्रायोगिक अंमलबजावणीसाठी आठ बॅंकांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील चार शहरांमध्ये ही अंमलबजावणी होईल. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चार बँकांचा समावेश असेल. तर त्यानंतरच्या टप्प्यात आणखी चार बँकांचा म्हणजे बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या सहभागी होतील.  सुरुवातीला मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर  अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला या शहरांचा समावेश यात केला जाईल. आवश्यकतेनुसार या प्रायोगिक अंमलबजावणीत आणखी बँका, ग्राहक आणि स्थानांचा समावेश केला जाऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी